Hair care : कोरड्या केसांची काळजी कशी घ्यावी ? घरच्या घरी तयार करा हेअरमास्क
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
तुमचे केस जर कोरडे आणि निर्जीव दिसत असतील तर काही घरगुती उपायांनी मऊ, मुलायम करु शकता. जाणून घेऊया केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी कोणते हेअर मास्क वापरता येऊ शकतात.
मुंबई : तुमचे केस जर कोरडे आणि निर्जीव दिसत असतील तर काही घरगुती उपायांनी मऊ, मुलायम करु शकता. जाणून घेऊया केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी कोणते हेअर मास्क वापरता येऊ शकतात.
हे हेअर मास्क घरी बनवता येतात, आणि केसांना लावल्यास केसांचा कोरडेपणा कमी होतो, केस मऊ होतात आणि केसांची चमक कायम राहते. हे हेअर मास्क बनवणंही खूप सोपं आहे.
केळी आणि दही हेअर मास्क -
हा हेअर मास्क बनवण्यासाठी एक केळं कुस्करुन घ्या. त्यात थोडा मध आणि दही घालून पेस्ट बनवा.
advertisement
हा तयार हेअर मास्क 30 ते 40 मिनिटं केसांवर ठेवल्यानंतर डोकं धुवून स्वच्छ करा. या हेअर मास्कमधून
केसांना लॅक्टिक ॲसिड, जीवनसत्त्वं आणि पोटॅशियम मिळतं, ज्यामुळे केसांना चमक येते.
दूध आणि मध मास्क -
advertisement
दूध आणि मधापासून बनवलेला हेअर मास्कही उपयुक्त आहे. या हेअर मास्कमुळे केस इतके मऊ होतात.
हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका भांड्यात २ चमचे दूध आणि थोडा मध घालून मिक्स करा. आता हे मिश्रण केसांना मुळापासून टोकापर्यंत लावा आणि नंतर धुवून काढा. हा हेअर मास्क 20 मिनिटांसाठी केसांवर लावता येतो.
अंडी आणि दही हेअर मास्क -
advertisement
हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका अंड्यामध्ये ३ चमचे दही मिसळा. हे मिश्रण अर्धा तास
केसांवर ठेवल्यानंतर केस धुवा. केस मऊ होतात आणि चमकदार दिसतात.
दही आणि लिंबाचा रस मास्क -
केस मऊ दिसण्यासाठी, हा फेस मास्क वापरून पहा. अर्धा कप साधं दही घ्या आणि
advertisement
त्यात एका लिंबाचा रस घाला. हा हेअर मास्क केसांवर 30 ते 35 मिनिटं लावा आणि नंतर धुवा.
पण तुम्हाला स्काल्प ( Scalp) म्हणजे टाळूसंबंधित काही तक्रारी असतील तर
तर लिंबाचा रस लावणं टाळा.
मध आणि नारळ तेल मास्क -
हा हेअर मास्क लावण्यासाठी २ चमचे खोबरेल तेल आणि एक चमचा मध मिसळा. हा हेअर मास्क केसांवर अर्धा तास ठेवा आणि नंतर शॅम्पूनं केस धुवा. केस मऊ आणि चमकदार दिसू लागतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 12, 2024 12:49 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hair care : कोरड्या केसांची काळजी कशी घ्यावी ? घरच्या घरी तयार करा हेअरमास्क