Peanuts : शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी का पिऊ नये ? आयुर्वेदानुसार काय योग्य आणि काय अयोग्य ?

Last Updated:

शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे असं म्हणतात. ते का समजून घेऊयात..

News18
News18
मुंबई : शेंगदाणे स्वयंपाकात वापरले जातात आणि खाऊ म्हणूनही सगळे उत्साहात खातात. शेंगदाणे अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असतात आणि यामध्ये प्रथिनं, जीवनसत्त्वं आणि खनिजंही भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच पण ते आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे असं म्हणतात. ते का समजून घेऊयात..
आयुर्वेदानुसार शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. याविषयीचा आयुर्वेदिक दृष्टीकोन आणि त्याच्याशी संबंधित ही महत्त्वाची माहिती..आयुर्वेदानुसार, आपल्या पचनसंस्थेत वात, पित्त आणि कफ हे तीन दोष असतात आणि या तिन्हीचं प्रमाण संतुलित असणं आवश्यक आहे. यापैकी कोणत्याही प्रकाराचं प्रमाण असंतुलित असेल तर शरीरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. शेंगदाणे हे गरम आणि जड अन्न मानलं जातं, जे पचवण्यासाठी शरीराला थोडे कष्ट करावे लागतात. शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया बिघडते, त्यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो.
advertisement
पचनावर परिणाम
शेंगदाणे जड असल्यानं त्याचे पचन शरीरासाठी थोडे कठीण असते. जेव्हा आपण ते खातो तेव्हा आपल्या
शरीरात पाचक रस सक्रिय होतात ज्यामुळे त्याचं पचन व्यवस्थित होतं. या काळात पाणी प्यायलं तर पाचक रस पातळ होतात आणि शेंगदाणे पचण्यास त्रास होऊ शकतो. यामुळे गॅस, अपचन, पोटात जडपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
advertisement
घसा आणि छातीत त्रास
शेंगदाणे गरम प्रकृतीचे असतात आणि जेव्हा तुम्ही ते खाता तेव्हा त्यांचा घसा आणि छातीत परिणाम होतो.यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास घसा आणि छातीत त्रास होऊ शकतो. यामुळे खोकला, घसा खवखवणं आणि श्वसनाचा त्रास होऊ शकतो.
advertisement
चयापचयावर परिणाम
शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर चयापचयावरही परिणाम होतो. शेंगदाणे खाल्ल्यानंतर, आपलं शरीर ते पचवण्यासाठी अधिक ऊर्जा वापरतं आणि पाणी प्यायल्यामुळे ही प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे वजन वाढू शकतं आणि चयापचय समस्या उद्भवू शकतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Peanuts : शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी का पिऊ नये ? आयुर्वेदानुसार काय योग्य आणि काय अयोग्य ?
Next Article
advertisement
Bharat Gogawale: भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून मोठी घडामोड, विकास गोगावलेंवरील कारवाईचं कारण काय?”
भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून मोठी घडामोड, विकास गोगावलेंवरील कार
  • भरत गोगावले यांचे पुत्र आणि शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना कोअर कमिटी सदस्य विकास

  • विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने तब्बल तीन वेळा फेटाळला आहे.

  • आता महाड पोलीस कोणती कारवाई करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

View All
advertisement