Manoj Vajpeyee: 'घुसखोर पंडत'च्या वादावर मनोज वाजपेयीची प्रतिक्रिया, 'फॅमिली मॅन' फेम अभिनेता काय म्हणाला?
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
'घुसखोर पंडत' चित्रपटाच्या नावावरून मनोज वाजपेयीने महत्त्वाचं विधान केलं आहे. एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने देशातल्या नागरिकांविषयी महत्त्वाचं विधान केलं आहे.
मनोज वाजपेयीच्या 'घुसखोर पंडत' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटाच्या नावाच्या टायटलमुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दिल्लीमध्ये ब्राह्मण समाजाकडून जोरदार प्रदर्शने करण्यात आली होती. नुकतंच चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाच्या नावामध्ये बदल करणार असल्याचे सांगितले आहे. तेव्हापासून चित्रपटाचा वाद काही अंशी कमी झालेला पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या नावावरूनच मनोज वाजपेयीने महत्त्वाचं विधान केलं आहे. एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने देशातल्या नागरिकांविषयी महत्त्वाचं विधान केलं आहे. नेमकं मनोज वाजपेयी काय म्हणालाय, जाणून घेऊया..
नीरज पांडे दिग्दर्शित, 'घुसखोर पंडत' चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. अद्याप चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झालेली नाही. चित्रपटाविरोधात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्लीसह काही ठिकाणी प्रदर्शने करण्यात आले होते. या चित्रपटाविरोधातील विषय दिल्ली हायकोर्ट पर्यंत पोहोचला होता. दिल्ली हायकोर्टामध्ये चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव बदलण्याची माहिती दिली असून लवकरात लवकर नवीन जाहीर केले जाईल अशी माहिती निर्मात्यांनी कोर्टात दिली. डेक्कन क्रोनिकलला दिलेल्या मुलाखतीत मनोज वाजपेयी यांनी चित्रपटाविषयी महत्त्वाचं विधान केलं आहे.
advertisement
'घुसखोर पंडत' चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादंगाबद्दल मनोज वाजपेयी म्हणाला की, "भारत देश फारच संवेदनशील राष्ट्र बनला आहे. देशातले नागरिक आपला संयम गमावून बसले, वैयक्तिक पातळीवर समोरच्याला लगेचच अपशब्द वापरले जातात. सध्या चित्रपटाची टीम चित्रपटाच्या टायटलबद्दल काळजीपूर्वक विचार करत चित्रपटाचं नाव ठरवत आहेत." जेव्हा पहिल्यांदा वाद निर्माण झाला त्यावेळी मनोज वाजपेयीने आणि चित्रपटाचे निर्मात्यांनी एक एक्स पोस्ट सुद्धा शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये मनोज वाजपेयींनी लिहिलं की, "लोकांनी व्यक्त केलेल्या भावनांचा मी आदर करतो, मी त्यांचा गांभीर्याने विचार करतोय. लोकांकडून ज्या गोष्टींचा विचार केला जात आहे, जर त्याचा आपण भाग असाल तर त्याचा आपण विचार करायला हवा."
advertisement
पुढे मनोज लिहिलंय की, "लोकं ज्या भावना आपल्या समोर मांडत आहेत, त्यांचं आपण थांबून ऐकायला हवं. एक अभिनेता म्हणून, मी कॅरेक्टर आणि स्टोरीतून चित्रपटात आलो. मला एका भ्रष्ट व्यक्तीचे आणि त्याच्या आत्मसाक्षात्काराचे चित्रण करायचे होते. कोणत्याही समुदायाबद्दल स्टिरियोटाइप निर्माण करण्याचा माझा हेतू नव्हता.चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावरून काढून टाकला आहे." 'घुसखोर पंडित" चित्रपटात मनोज वाजपेयी एका भ्रष्ट पोलिस अधिकार्याची भूमिका साकारत आहे. लोक त्यांना "पंडित" असे टोपणनाव देतात. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर ब्राह्मण समाजाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. अनेक ठिकाणी चित्रपट निर्माते आणि मनोज वाजपेयीचे पुतळेही जाळण्यात आले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 4:51 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Manoj Vajpeyee: 'घुसखोर पंडत'च्या वादावर मनोज वाजपेयीची प्रतिक्रिया, 'फॅमिली मॅन' फेम अभिनेता काय म्हणाला?









