याशिवाय टॅनिंग कमी करण्यासाठीही साय वापरली जाते. साय चेहऱ्यावर नुसती लावता येते तसंच त्यापासून वेगवेगळे फेस पॅक देखील बनवता येतात. हे फेस पॅक बनवायला सोपे आहेत. या दिवसात तुमची त्वचा कोरडी होत असेल साय कशी वापरता येईल पाहूया.
Face Care Tips: चेहऱ्यासाठी करा तुपाचा वापर, तुपात मिसळून लावा या गोष्टी, चेहरा दिसेल तजेलदार
advertisement
साय आणि केळी
साय आणि केळी हा फेस पॅक त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. यामुळे त्वचेवर साचलेली घाण निघून जाते आणि खडबडीत झालेली त्वचा मुलायम होते. हा फेस पॅक बनवण्यासाठी केळ्यामध्ये २ चमचे साय मिसळा आणि कुस्करुन घ्या. हे मिश्रण संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावा. हे लावल्यानंतर आणि 20 ते 25 मिनिटं ठेवा, नंतर, चेहरा धुवा आणि स्वच्छ करा.
साय आणि मध
हा फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात 2 चमचे साय घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला. आता त्यात एक
चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करून मिश्रण बनवा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. सर्वप्रथम चेहरा पाण्यानं धुवून स्वच्छ करा. आता हा फेस पॅक लावा आणि 10 ते 15 मिनिटं ठेवल्यानंतर चेहरा धुवून स्वच्छ करा.
साय आणि बेसन
चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी हा फेस पॅक तयार करा. या फेस पॅकसाठी एक चमचा बेसन एक चमचा सायीमध्ये घालून मिक्स करा. हा फेस पॅक 15 मिनिटं चेहऱ्यावर ठेवा. बेसन आणि सायीची पेस्ट खूप घट्ट असेल तर त्यात थोडं दूध घाला. हा फेस पॅक आठवड्यातून एकदा 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावता येतो.
Methi Water Health Benefits: 1 महिना प्या मेथीचं पाणी, होतील इतके फायदे की विश्वास बसणार नाही