अनेक पदार्थ मधुमेहींसाठी प्रतिबंधित आहेत. पण असे अनेक अन्न घटक आहेत, जे मधुमेहींसाठी महत्त्वाचे आहेत.स्वादुपिंड पुरेसं इन्सुलिन तयार करत नाही, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. साखरेवर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही तर अनेक आजारांचा धोका वाढतो. जाणून घेऊया मधुमेहामध्ये साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणतं ज्यूस प्यावं.
advertisement
1. पालकाचा रस
पालकाचा रस मधुमेहामध्ये खूप फायदेशीर मानला जातो. पालकामध्ये जीवनसत्त्वं आणि खनिजं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
2. आवळा रस
आवळा चवीसाठी प्रसिद्ध आहेच पण आवळा म्हणजे आरोग्याचा खजिना मानला जातो. आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि हायपोग्लाइसेमिक गुणधर्म असतात ज्यामुळे रक्तातील साखर कमी होते. मधुमेही रुग्ण सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस पिऊ शकतात.
Vitamin B 12 : व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर करा मात, हिरव्या मुगाचं पाणी प्या, तब्येतीसाठी आहे पोषक
3. शेवग्याच्या पानांचा रस
साखर नियंत्रित करण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचा वापर केला जातो. शेंगांचा रस पिऊन रक्तातील साखरेची पातळी सहज नियंत्रित केली जाऊ शकते.
4. कारल्याचा रस
कारल्याची भाजी आहे जी फार कमी लोकांना खायला आवडते. पण मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारलं खूप फायदेशीर मानलं जातं. दररोज सकाळी अर्धा कप कारल्याचा रस प्यायल्यानं रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.