Malai for Skin : हिवाळ्यात कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी चांगला पर्याय, साय लावा, त्वचा होईल मुलायम

Last Updated:

हिवाळ्यात चेहऱ्यावर कोरडेपणा दिसू लागतो. त्वचेला तडे जातात आणि चेहरा निर्जीव दिसतो. अशा वेळी क्रीम्स आणि मॉइश्चरायझर्सचाही फारसा परिणाम दिसून येत नाही. पण, मलाई म्हणजे साय हा घरगुती उपाय आहे ज्यामुळे त्वचा मुलायम होईल.

News18
News18
मुंबई : हिवाळ्यात किंवा एरवीही तुमचा चेहरा निस्तेज वाटत असेल तर एक सोपा उपाय. खरं तर हे उपाय वर्षांनुवर्षं घराघरात केले जातायत. त्यातला एक उपाय म्हणजे डाळीचं पीठ लावणं आणि दुसरा म्हणजे साय. यामध्ये आणखी काही जिन्नस घातले तर चेहरा तुकतुकीत दिसेल.
स्वयंपाकघरातल्या खजिन्यामधला हा अजून एक पर्याय, विशेषतः हिवाळ्यात चेहऱ्यावर कोरडेपणा दिसू लागतो. त्वचेला तडे जातात आणि चेहरा निर्जीव दिसतो. अशा वेळी क्रीम्स आणि मॉइश्चरायझर्सचाही फारसा परिणाम दिसून येत नाही. पण, मलाई म्हणजे साय हा घरगुती उपाय आहे ज्यामुळे त्वचा मुलायम होईल.
advertisement
  • साय लावल्यानं चेहऱ्याला पुरेशी आर्द्रता मिळते. यामुळे त्वचा दिवसभर मॉईश्चराइज राहते.
  • टॅनिंग कमी करण्यासाठीही सायीचा उपयोग होतो. मलईमध्ये अँटी-ऑक्सिडंट असतात जे त्वचेला सनबर्न आणि सनटॅन या दोन्हीपासून दूर ठेवतात.
  • चेहऱ्यावर साय लावल्यानं त्वचेवर साचलेली धूळ निघते आणि त्वचा स्वच्छ दिसते.
  • कोरडेपणामुळे त्वचेवर जळजळ होत असेल त्यासाठीही साय हा उत्तम पर्याय आहे.
  • साय नैसर्गिक क्लीन्सर म्हणून काम करते. यामुळे त्वचेवर साचलेली धूळ निघून त्वचा चमकदार बनते.
advertisement
सायीमध्ये असलेली जीवनसत्त्वं त्वचेला चमकदार बनवण्यासाठी प्रभावी आहेत. हे चेहऱ्यावर लावल्यानं निस्तेज त्वचा देखील चमकते.
चेहऱ्यावर साय कशी लावायची -
  • चेहऱ्यावर साय नुसती लावता येते. किंवा सायीमध्ये हळद मिक्स करून चेहऱ्याला लावता येते. अर्धा वाटी सायीमध्ये चिमूटभर हळद मिसळून पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी धुवून टाका. चेहरा चमकतो.
  • चमकदार त्वचेसाठी लिंबाचा रस सायीमध्ये मिसळून चेहऱ्यावर लावता येतो. लिंबाचा रस आणि मलई त्वचा स्वच्छ करण्यासाठी प्रभावी पर्याय आहेत.
  • साय आणि बेसन मिक्स करुनही फेस पॅक लावू शकता. हा फेस पॅक बनवण्यासाठी 2 चमचे बेसन, एक चमचा साय आणि अर्धा चमचा मध मिक्स करा. त्यात चिमूटभर हळदही टाकता येईल. नीट मिक्स केल्यानंतर हा फेसपॅक 20 मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा.
  • सायीमध्ये साखर मिसळून फेस स्क्रब बनवता येतो. हा स्क्रब चेहऱ्यावर एक ते दीड मिनिटं चोळल्यानंतर धुवून स्वच्छ करा. चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकल्या जातात.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Malai for Skin : हिवाळ्यात कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी चांगला पर्याय, साय लावा, त्वचा होईल मुलायम
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement