बीडमध्ये सयाजी शिंदेंनी उभारलेल्या देवराईला भयंकर आग, फोटो समोर

Last Updated:
आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तैनात आहेत.
1/7
बीड जिल्ह्यापासून जवळच असलेल्या पालवन शिवारात सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून आणि वनविभागाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या सह्याद्री देवराई प्रकल्पाला भीषण आग लागली आहे.

advertisement
2/7
 या आगीत शेकडो झाडे व रोपे जळून खाक झाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तैनात आहेत.

3/7
समोर आलेल्या माहितीनुसार  पालवन शिवारातील देवराई परिसरात धुराचे लोट दिसू लागले. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले.

4/7
 सध्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळलेले गवत असल्याने आगीचा भडका अधिकच वाढत आहे. आगीत झाडाझुडपांसह जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे.

5/7
सह्याद्री देवराई प्रकल्प हा पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या प्रकल्पांतर्गत स्थानिक वृक्षलागवड, देवराई संवर्धन व जैवविविधतेचे संरक्षण करण्यात येत होते.

6/7
या आगीमुळे अनेक वर्षांच्या मेहनतीला फटका बसल्याचे चित्र आहे. आगीत लहान-मोठी झाडे, रोपे तसेच वन्यजीवांचे अधिवास बाधित झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

7/7
आगीची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.  अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले असून त्यांची वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement