Science : रस्त्यावरच्या पांढऱ्या पट्ट्या रात्री चमकतात, पण दिवसा का नाही? यामागे कोणती बॅटरी आहे की अजून काही?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हेडलाईटचा प्रकाश पडला की त्या पट्ट्या एखाद्या ट्यूबलाईटसारख्या चमकतात, ज्यामुळे आपल्याला रस्ता कुठे वळतोय हे स्पष्ट दिसतं. पण गंमत बघा, दिवसा मात्र याच पट्ट्या अगदी साध्या पांढऱ्या रंगासारख्या दिसतात, त्यात कोणतीही चमक नसते.
रात्रीच्या वेळी हायवेवरून प्रवास करताना तुम्ही एक गोष्ट नक्कीच नोटीस केली असेल. रस्त्याच्या कडेला आणि मध्यभागी असलेल्या त्या पांढऱ्या पट्ट्या अंधारात अगदी लखलखत असतात. हेडलाईटचा प्रकाश पडला की त्या पट्ट्या एखाद्या ट्यूबलाईटसारख्या चमकतात, ज्यामुळे आपल्याला रस्ता कुठे वळतोय हे स्पष्ट दिसतं. पण गंमत बघा, दिवसा मात्र याच पट्ट्या अगदी साध्या पांढऱ्या रंगासारख्या दिसतात, त्यात कोणतीही चमक नसते.
advertisement
advertisement
1. हा साधा रंग नाही, तर आहे काचेची जादूरस्त्यावर जे पांढरे पट्टे मारले जातात, तो साधा ऑईल पेंट नसतो. या रंगाला 'थर्मोप्लास्टिक रोड मार्किंग पेंट' म्हणतात. पण या रंगाला खरी चमक मिळते ती त्यामध्ये मिसळलेल्या 'ग्लास बीड्स' (Glass Beads) मुळे. हे छोटे छोटे काचेचे मणी असतात, जे वाळूच्या कणांसारखे बारीक असतात. जेव्हा रस्ता रंगवला जातो, तेव्हा ओल्या रंगावर हे काचेचे मणी पसरवले जातात.
advertisement
2. 'रेट्रो-रिफ्लेक्शन' म्हणजे काय? (Retro-reflection)दिवसा सूर्याचा प्रकाश चहूकडे पसरलेला असतो, त्यामुळे हे काचेचे मणी वेगळे चमकताना दिसत नाहीत. पण रात्रीच्या वेळी जेव्हा तुमच्या गाडीचा हेडलाईट या पट्ट्यांवर पडतो, तेव्हा रेट्रो-रिफ्लेक्शनची प्रक्रिया घडते. सोप्या भाषेत सांगायचं तर, काचेचे हे मणी प्रकाशाला इकडे-तिकडे न फेकता तो पुन्हा थेट प्रकाशाच्या स्त्रोताकडे म्हणजेच तुमच्या डोळ्यांकडे परत पाठवतात. यामुळे आपल्याला त्या पट्ट्या चमकताना दिसतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








