एक चूक आणि हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याला सव्वा 11 कोटीचा दंड, प्रकरण नेमकं काय?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
ऊस नियंत्रण आदेशानुसार ऊस गाळप करण्यासाठी साखर उत्पादकाने साखर आयुक्तालयाकडून गाळप परवाना घेणे बंधनकारक आहे.
मधुकर गलांडे, प्रतिनिधी, इंदापूर : साखर आयुक्तालयाकडून परवाना मिळण्याआधीच ऊस गाळप सुरू केल्याप्रकरणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याला साखर आयुक्तांनी सोमवारी सव्वा अकरा कोटीचा दंड ठोठावला आहे.
सन २०२५-२६ या गाळप हंगामातील ऊस गाळपाला राज्यात एक नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली. ऊस नियंत्रण आदेशानुसार ऊस गाळप करण्यासाठी साखर उत्पादकाने साखर आयुक्तालयाकडून गाळप परवाना घेणे बंधनकारक आहे. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील महासंघाचे अध्यक्ष असताना त्यांच्या कारखान्याने परवाना मिळणे आधीच गाळप सुरू कसे केली. दस्तुरखुद्द साखर संघाचे अध्यक्षन असताना पाटील यांनी अशी कृती केल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
advertisement
इंदापूर तालुक्यातील महात्मा फुले नगर येथील शंकरावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने 20 ऑक्टोबरला प्रादेशिक सहसंचालकाकडे ऑनलाईन पद्धतीने प्रस्ताव दाखल केला होता. मात्र परवाना मिळणे आधीच गाळप सुरू केल्याचे साखर आयुक्तालयाला आढळून आल्याने याप्रकरणी कारखान्याला पाचशे रुपये प्रति टन याप्रमाणे ११ कोटी २१ लाख ४९ हजार पाचशे रुपयांचा दंड ठरवण्यात आला आहे.
advertisement
कोण आहेत हर्षवर्धन पाटील
हर्षवर्धन पाटील सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघात त्यांचा पराभव झाला
त्याआधी ते भारतीय जनता पक्षाचे नेते होते, २०१९ सालीही त्यांचा पराभव झाला होता
काँग्रेस पक्षात असताना त्यांनी विविध मंत्रिपदे भूषवली, अनेक मुख्यमंत्र्यांच्या अतिशय निकटवर्तीय ते होते
संसदीय कामकाज मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 9:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एक चूक आणि हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याला सव्वा 11 कोटीचा दंड, प्रकरण नेमकं काय?










