Madhuri Dixit: 58 वर्षीय माधुरीने भल्याभल्या पैलवानांना लोळवलं; 'मिसेस देशपांडे'साठी केलं असं काही... होतंय कौतुक
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Madhuri Dixit in Mrs. Deshpande: आजवर आपण तिला रोमँटिक हिरोईन किंवा प्रेमळ आईच्या भूमिकेत पाहिलंय, पण 'मिसेस देशपांडे' या नवीन सीरिजमध्ये माधुरी चक्क जबरदस्त अॅक्शन करत गुंडांची हाडं खिळखिळी करताना दिसत आहे.
advertisement
advertisement
advertisement
याबद्दल बोलताना माधुरीने सांगितलं, "प्रेक्षकांना हे खरं वाटायला हवं. जेव्हा एखादी मध्यमवयीन, साधी गृहिणी तिच्यापेक्षा दुप्पट आकाराच्या पुरुषाशी दोन हात करते, तेव्हा त्यात एक वेगळीच ताकद असते. ते नैसर्गिक दिसावं म्हणूनच मी स्वतः हे स्टंट्स करायचं ठरवलं." इस्रायली स्वसंरक्षण कला असलेल्या 'क्राव मागा'चे धडे गिरवून माधुरीने पडद्यावर जो राडा घातला आहे, ते पाहून प्रेक्षकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे.
advertisement
advertisement
advertisement
आपल्या आजवरच्या प्रवासावर भाष्य करताना माधुरीने एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली. तिने म्हटलं की, "लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षक जगभरातील सिनेमा पाहू लागले आहेत. आता त्यांना केवळ ग्लॅमर नकोय, तर जिवंत अभिनय हवा आहे. माझ्या करिअरची सुरुवात 'अबोध'पासून झाली तेव्हापासून मी नियम मोडत आले आहे. महिलांना अशा कणखर आणि नकारात्मक छटा असलेल्या भूमिका मिळणं ही काळाची गरज आहे."









