Car: डिसेंबर महिन्यात का कार खरेदी करू नये? लोक का टाळतात? 5 सिक्रेट कारणं

Last Updated:

आपल्या दारात कार असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे आपली पहिली ड्रीम कार खरेदीसाठी लोक चांगल्या ऑफर आणि संधीची वाट पाहत असतात. पण

News18
News18
भारतात जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे वाहनांच्या किंमती चांगल्याच कमी झाल्या आहेत. त्यामुळे कारच्या किंमतीत एसयूव्ही आता मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये बंपर अशी कार आणि दुचाकीची विक्री झाली आहे. आताा अनेक कंपन्यांकडून डिसेंबर महिन्यातही चांगल्या ऑफर दिल्या आहेत. पण, वर्षाच्या अखेरीस लोक वाहन खरेदीचं टाळतात, त्याचं कारणही तसंच आहे.
आपल्या दारात कार असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे आपली पहिली ड्रीम कार खरेदीसाठी लोक चांगल्या ऑफर आणि संधीची वाट पाहत असतात. पण, बरे जण हे डिसेंबर महिना शक्यतो टाळतात. त्याचं कारण म्हणजे, वर्षाची तारीख आणि रिसेल व्हॅल्यू कमी होते.
1.मुळात कार खरेदी केल्यावर ती कितीही नवीन असली तरी जुनी झाल्यावर किंमत कमी होतेच. जर तुम्ही डिसेंबर २०२५ मध्ये कार खरेदी केली आणि तुमच्या मित्राने १ जानेवारी २०२६ ला गाडी खरेदी केली. यामध्ये फक्त एका दिवसा किंवा एका महिन्याचा फरक आहे. पण जेव्हा तुम्ही कार विकायला जाल तेव्हा तुमची कार ही २०२५ चं मॉडेल समजलं जाईल आणि तुमच्या मित्राची कार ही २०२६ चं मॉडेल. त्यामुळे कारच्या किंमतीत बराच फरक होईल. जवळपास १० ते २० टक्के फरक हा मॉडेलनुसार जाणवतो.
advertisement
2. आता कार कंपन्या काय करतात, डिसेंबर महिन्यात दमदार अशा ऑफर देतात. तसंच फेसिलिफ्ट मॉडेल किंवा नवी व्हर्जन लाँच करतात. त्यामुळे आधीच्या गाडीतले फिचर्स फक्त नव्या नावासह कारमध्ये मिळू शकतात.
3. डिसेंबरमध्ये कार खरेदी करण्याचा एक फायदाही असतो, तो म्हणजे किंमत. कारण, नव्या वर्षात जानेवारी महिन्यात कार कंपन्या वाढत्या महागाईचं कारण देऊन कारच्या किंमतीत ५ टक्क्यांपर्यंत वाढ करतात. त्यामुळे काही जण हे डिसेंबर महिन्यात गाडी घेतात तर काही जण जानेवारीची वाट पाहतात.
advertisement
4. कार कंपन्या जुन्या वर्षातला स्टॉक क्लिअर करण्यासाठी डिलर्सकडून खास ऑफर आणतात. यामध्ये कॅशबॅक, डिस्काउंट आणि गिफ्टही दिले जातात. बऱ्याच वेळा या कार कंपन्यामध्ये बऱ्याच काळापासून उभ्या असतात. त्याच डिसेंबरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतात.
मग कार कधी घ्यायची? 
जर तुमच्या कार खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर आधी बजेटकडे लक्ष द्या. समजा, तुम्हाला ड्रायव्हिंग स्किल सुधारायची असेल किंवा ५ ते ६ वर्ष गाडी वापरायची असेल तर नवीन वर्षाची वाट पाहायची गरज नाही. डिसेंबर महिन्यात चांगल्या फिचर्स आणि कमी किंमतीत कार खरेदी करू शकतात, ही डील तुमच्यासाठी चांगली असेल.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Car: डिसेंबर महिन्यात का कार खरेदी करू नये? लोक का टाळतात? 5 सिक्रेट कारणं
Next Article
advertisement
CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement