Hyundai i20 घेऊन या घरी, इथं मिळतेय 93000 रुपयांनी स्वस्त, अट एकच!
- Published by:Sachin S
Last Updated:
जीएसटीच्या कपातीनंतर पुन्हा एकदा Hyundai ने CSD कँटीनमध्ये कार खरेदी करणाऱ्यांना खास गिफ्ट दिलं आहे.
दक्षिण कोरियन कंपनी Hyundai ने भारतात एकापाठोपाठ एक दमदार आणि पॉवरफुल गाड्या लाँच करून मार्केटवर आपली पकड मजबूत केली. आता डिसेंबर महिन्या Hyundai ने खास ऑफर आणली आहे. Hyundai ने आपल्या i20 प्रीमियम हॅचबॅक कारची किंमत कमी केली आहे. जीएसटीच्या कपातीनंतर पुन्हा एकदा Hyundai ने CSD कँटीनमध्ये कार खरेदी करणाऱ्यांना खास गिफ्ट दिलं आहे. CSD कँटीनमध्ये फक्त 14 टक्के जीएसटी द्यावा लागतो. त्यामुळे Hyundai i20 कार ९३००० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
Cars24 च्या रिपोर्टनुसार, Hyundai i20 ची CSD मध्ये सुरुवातील किंमत 6.21 लाखांपासून सुरू होते. तर बाजारात या कारची किंमत एक्स-शोरूम 7.13 लाख रुपये इतकी आहे. त्यामुळे CSD कँटीनमध्ये कार खरेदी केली तर जवळपास ९२,000 रुपयांची बचत होते. काही व्हेरिएंटवर हीच बचत 93,000 रुपयांपर्यंत आहे.
CSD कँटीनमध्ये इतकी स्वस्ताई कशी?
CSD म्हणजेच 'कॅन्टीन स्टोर्स डिपार्टमेंट' हे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांमार्फत चालवलं जातं. सैन्य दलात असललेल्या आणि निवडक लोकांसाठी इथं सवलत मिळत असते. इथं स्वस्तात जीवनावश्यक वस्तू आणि वाहनं सुद्धा खरेदी करता येते. CSD मधून कार खरेदी करण्यासाठी भारतीय लष्करातील कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचारी, संरक्षण कर्मचारी (डिफेंस स्टाफ), माजी सैनिक आणि शहीद सैनिकांच्या पत्नी पात्र असतात. जर तुम्ही सैन्य दलाशी निगडित असाल तर कारची डिल ही उत्तम पर्याय आहे.
advertisement

Hyundai i20 फिचर्स
view commentsHyundai i20 मध्ये १.२ लिटरचं पेट्रोल इंजिन दिलं आहे. जे दमदार पॉवरसह येतं. Hyundai i20 मध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्सचा दिले आहे. फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर यात मोठी टचस्क्रीन, डिजिटल मीटर, प्रीमियम साउंड सिस्टम, वायरलेस चार्जिंग आणि सनरूफ या सारखे फिचर्स आहे. सुरक्षेसाठी ६ एअरबॅग्स, ABS आणि स्टेबिलिटी कंट्रोल सारखे फिचर्स आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 11:51 PM IST








