Rohit Sharma : रोहित भाऊ वडापाव खाणार का? चाहत्याच्या ऑफरला 'हिटमॅन'च खतरनाक उत्तर, VIDEO आला समोर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
एका चाहत्याने रोहित शर्माला वडापाव ऑफर केला आहे. या ऑफरवर त्याने जी प्रतिक्रिया दिली आहे ती पाहून सगळेच हसले आहेत.
Rohit Sharma News : टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळतो आहे, या स्पर्धेत आज मुंबईकडून खेळताना रोहित शर्माने सिक्कीम विरूद्ध 155 धावांची खेळी केली होती.या खेळीच्या बळावर त्याने एकट्याने मुंबईला सामना जिंकून दिला. तसेच या खेळीमुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कारही देण्यात आला होता. या सामन्या दरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका चाहत्याने रोहित शर्माला वडापाव ऑफर केला आहे. या ऑफरवर त्याने जी प्रतिक्रिया दिली आहे ती पाहून सगळेच हसले आहेत.
advertisement
खरं तर मुंबई सिक्कीम सामन्या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित बाउंन्ड्री लाईनवर फिल्डींग करत असताना काही चाहते त्याच्या मागून रोहित भाऊ वडापाव खाणार का? अशी ऑफर देतात. यावर रोहित शर्मा हात वरून नको रे बाबा अशी रिअॅक्शन देताना दिसला आहे. रोहितही ही रिअॅक्शन पाहून सगळे पोट धरून हसले आहेत.या व्हिडिओची प्रचंड चर्चा आहे.
advertisement
A fan said - Rohit bhai Vadapav khaoge kya?
Rohit Sharma said - No
Bro is strictly following his diet plan 😂❤️ pic.twitter.com/IVrodC0WM3
— Tejash (@Tejashyyyyy) December 24, 2025
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचा सिक्कीम विरूद्ध सामना पार पडला होता. या सामन्यात मुंबईकडून खेळताना टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माने 94 बॉलमध्ये 155 धावांची वादळी खेळी केली होती.या खेळी दरम्यान रोहितने 9 षटकार आणि 18 चौकार लगावले आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 164 होता.रोहितने अशाप्रकारे ही वादळी खेळी करून 30 ओव्हरमध्येच मॅच संपवली आहे. त्यामुळे मुंबईने सिक्कीमवर दणदणीत विजय मिळवला आहे.
advertisement
कसा रंगला सामना
खरं तर सिक्कीमने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 236 धावा ठोकल्या होत्या. सिक्कीमकडून आशिष थापाने 79 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. मुंबईकडून यावेळी कर्णधार शार्दुल ठाकूर 2, तुषार देशपांडे, तनुश कोटीयन, शम्स मुलानी आणि मुशीर खानने प्रत्येकी 1 विकेट काढली आहे.
advertisement
या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईकडून रोहित शर्माने 155 धावांचीद दीड शतकीय खेळी केली. या खेळीच्या बळावर मुंबईने 30.3 ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठत हा सामना जिंकला आहे.दरम्यान सिक्कीमकडून क्रांथी कुमार आणि अंकुर मलिकने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती. हा सामना जिंकून मुंबईने चांगली सूरूवात केली आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 11:51 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : रोहित भाऊ वडापाव खाणार का? चाहत्याच्या ऑफरला 'हिटमॅन'च खतरनाक उत्तर, VIDEO आला समोर









