Dryfruits with Honey : शरीराला द्या पौष्टिक खाद्य, सुका मेवा मधात भिजवून खा, तब्येत राहिल ठणठणीत

Last Updated:

सुका मेवा कोरडा किंवा भिजवून खाऊ शकतो, पण सुका मेवा मधासोबत खाल्ला तर सुक्या मेव्याचे फायदे दुप्पट होतात.

News18
News18
मुंबई : सुका मेवा आणि मधाचं महत्त्व आपण वडीलधारी मंडळींकडून ऐकत आलो आहोत. काही जण सुका मेवा नुसता खातात, काही जण पाण्यात भिजवून तर काही जण दुधात भिजवून खातात. पण हाच सुका मेवा मधात भिजवून खाणं शरीराच्या मजबुतीसाठी खूपच फायदेशीर आहे.
पाहूयात मधासोबत ड्रायफ्रुट्स खाण्याचे फायदे...
भिजवलेले बदाम, अक्रोड, बेदाणे, काजू यांसारखा मूठभर सुकामेवा शरीराला खूप ताकद देतो हे तुम्ही ऐकलं असेल. कारण अनेक संशोधनांनुसार सुका मेवा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि कोणत्याही वयोगटात त्याचं सेवन करायला काहीच हरकत नाही.
advertisement
सुका मेवा कोरडा किंवा भिजवून खाऊ शकतो, पण जर सुका मेवा मधासोबत खाल्ला तर सुक्या मेव्याचे फायदे दुप्पट होतात. मध आणि सुका मेवा एकत्र खाणं अधिक फायदेशीर ठरते कारण दोन्हीमध्ये फॅट आणि अँटीऑक्सिडंट असतात.
मध आणि ड्रायफ्रुट्स एकत्र खाल्ल्यानं शरीरातील ऊर्जा पातळी बराच काळ चांगली राहते. सुका मेवा मधासोबत खाल्ल्यास नैसर्गिक साखरेची पातळी वाढते आणि झटपट ऊर्जा मिळते. काजूमध्ये प्रथिनं, जस्त आणि लोह असतं. काजू मधासोबत खाल्ल्यानं ऊर्जा मिळते. मनुका आणि जर्दाळू मधासोबत खाल्ल्यास हृदयाचं आरोग्य राखण्यास मदत होते. तसंच शरीराला पोटॅशियम आणि फायबरसारखी पोषक तत्वं मिळतात.
advertisement
बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि फायबर असतं. मधासोबत खाल्ल्यानं हाडं मजबूत होतात. मध आणि सुक्या मेव्याचं सेवन केल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे शरीराला संसर्गापासून संरक्षण मिळतं. याच्या सेवनानं शरीराला पुरेसं फायबर मिळतं. यामुळे पचनक्रिया सुधारते. अक्रोडामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात असतं, जे मेंदूसाठी चांगलं मानलं जातं. मधासोबत खाल्ल्यास स्मरणशक्ती सुधारते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Dryfruits with Honey : शरीराला द्या पौष्टिक खाद्य, सुका मेवा मधात भिजवून खा, तब्येत राहिल ठणठणीत
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement