ग्वाल्हेर - एन्हेडोनिया या शब्दाचा अर्थ म्हणजे कोणत्याही कामात मन न लागणे असा होतो. या आजाराच्या रुग्णाला लॅक ऑफ इंटरेस्ट असतो. याचा अर्थ असा की, आवडीचा अभाव. हे लक्षण अनेकांमध्येही दिसून येतो. पण आता लहान मुलांमध्येही याची लक्षणे दिसून येत आहेत. हा रोग अनेकदा नैराश्यापूर्वी दिसून येतो. जर तुमच्या मुलामध्येही ही लक्षणे दिसत असतील तर काळजी घणे महत्त्वाचे आहे. यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी हे आपण जाणून घेऊयात.
advertisement
जी कामे आधी तुम्ही मन लावून करायचे, त्यात आता तुमचे मन न लागणे हे Anhedonia आजाराचे मुख्य लक्षण आहे. जसे की, प्रौढांमध्ये दिसून येते की, पूर्वी तुम्ही तुमचा छंद खूप मन लावून जोपासायचे. मात्र, आता तुम्हाला तसे वाटत नाही. आता तुम्हाला तुमचा छंद जसे की, गाणी ऐकणे, खेळणे यात आनंद येत नाही. असेच आता लहान मुलांमध्ये या आजाराची लक्षणे पाहायला मिळत आहेत.
जसे की, खेळण्यात मन न लागणे, एकटे एकटे बसून राहणे, निराश दिसणे, आपल्या मित्रांसोबत खेळायला जाण्यास मनाई करणे. जर मुलांमध्ये अशी लक्षणे दिसत असतील तर ही Anhedonia या आजाराची लक्षणे असू सकतात. बऱ्याचदा नैराश्यात जाण्यापूर्वी ही सर्व लक्षणे प्रौढ आणि मुलांमध्ये दिसतात. तुमच्या मुलामध्ये अशी लक्षणे दिसल्यास तुम्ही सावध व्हावे आणि लवकरात लवकर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अन्यथा या रोगाचे परिणाम गंभीर असू शकतात.
झोप येत नाहीये, अजिबात हलक्यात घेऊ नका ही लक्षणं, नेमकं काय कराल?, कामाची माहिती..
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कमलेश यांनी याबाबत लोकल18 शी बोलताना सांगितले की, दर महिन्याला मोठ्या संख्येने पालक त्यांच्याकडे येत असून यामध्ये मुलांना सतत अशा समस्या येत असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये आज स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे मुलांना सुट्टीच्या काळातही मोठ्या प्रमाणात होमवर्क दिला जातो. त्यानंतर मुलांना होमवर्क पूर्ण करण्यासाठी सुट्टीतही अभ्यास करावा लागतो. याशिवाय मुलांमध्ये अभ्यास आणि स्पर्धेबाबत मानसिक दडपण दिसू लागले आहे. त्यामुळे मुलांमध्ये Anhedonia आणि नैराश्याची लक्षणे वेगाने वाढत आहेत, असे त्यांनी सांगितले.
सूचना - या बातमीत दिलेल्या माहिती ही आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या चर्चेच्या आधारावर आहे. ही सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तिगत सल्ला नाही. त्यामुळे कोणतीही औषधी घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या बातमीतील मतांशी लोकल18 मराठी सहमत नसून जबाबदार नसेल.