TRENDING:

Zinc Oxide cream benefits: क्रिकेटर तोंडाला काय लावतात? पांढरी क्रीम फॅशनसाठी की सुरक्षेसाठी ? 99 % लोकांना माहिती नाही खरं उत्तर

Last Updated:

Benefits of Zinc Oxide cream in Marathi: अनेक खेळाडूंच्या चेहऱ्यावर, ओठांवर, गालावर किंवा फक्त डोळ्याखाली दिसणारं हे क्रीम साधंसुधं क्रीम नसून ते असतं झिंक ऑक्साईड सनस्क्रीम जे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी काम करतं. क्रिकेटपटू सहसा सनस्क्रीम किंवा झिंक ऑक्साईड असलेले विशेष लिप बाम वापरतात

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : क्रिकेट हा भारतीयांच्या आवडीचा खेळ. अनेकांसाठी जीव की प्राण आणि क्रिकेटमध्ये जेव्हा भारत पाकिस्तानमध्ये लढत असते तेव्हा तो सामना फक्त खेळ न राहता अनेकांसाठी ते धर्मयुद्ध ठरतं. महेंद्रसिंग धोनीपासून ते विराट कोहलीपर्यंत प्रत्येक क्रिकेटर हा कोणाचा कोणाचा हिरो होता. प्रत्येकाची एक खासीयत होती आहे आणि राहील.  प्रत्येकाचं एक स्टाईल अपील होतं. मात्र सगळ्या राष्ट्रीय - आंतराष्ट्रीय क्रिकेटर्सच्या वागण्यात एक साम्य दिसून येतं. अगदी जुन्या काळापासून ते आत्ताही हे साम्य दिसून येतंय. ये साम्य म्हणजे चेहऱ्य़ावर लावला जाणारा पांढरा रंग किंवा क्रिम.
News18
News18
advertisement

अनेकांना या पांढऱ्या रंगाविषयी किंवा क्रिम विषय़ी उत्सुकता आहे. नेमकं हे क्रीम आहे  तरी काय ? याचा फायदा काय ? जर तुम्हाला आठवत असेल तर सुरूवातीला इंग्लड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षीण आफ्रिकेच्या खेळाडूंकडून या क्रिमचा वापर सर्रासपणे केला जात होता. विशेष लक्षात राहण्यासारखे खेळाडू म्हणजे शेनवॉर्न, ॲलन डोनाल्ड किंवा जाँटी ऱ्होड्स, यांच्या चेहऱ्यावर असलेलं हे क्रिम सगळ्याचं लक्ष वेधून घ्यायचे. आजही अनेक खेळाडू हे क्रिम लावतात. मात्र अनेकांना प्रश्न पडतो की हे क्रिम नेमकं काय आहे ? याचे खरंच काही फायदे आहेत की, हे क्रिमफक्त स्टाईल किंवा फॅशनसाठी लावलं जातं.

advertisement

या क्रिमविषयी जाणून घेऊयात आजच्या लेखातून.

अनेक खेळाडूंच्या चेहऱ्यावर, ओठांवर, गालावर  किंवा फक्त डोळ्याखाली दिसणारं हे क्रिम साधंसुधं क्रिम नसून ते असतं झिंक ऑक्साईड सनस्क्रीन जे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी काम करतं. क्रिकेटपटू सहसा सनस्क्रीन किंवा झिंक ऑक्साईड असलेले विशेष लिप बाम वापरतात. हे क्रिम शरीरावर एक जाड थर तयार करतं जे सूर्यांच्या अतिनील किरणांपासून आणि थंडीपासूनही त्यांचं रक्षण करतात. कसोटी क्रिकेट किंवा एकदिवसीय सामन्यांमध्ये, जिथे खेळाडू बराच वेळ उन्हात किंवा थंडी उभं रहावं लागतं तिथे हे सनस्क्रीन खूप फायद्याचं ठरतं.सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांमुळे त्वचा आणि ओठांचे नुकसान होऊ शकते. झिंक ऑक्साईड सनस्क्रीन किंवा लिप बाम लावल्याने हे नुकसान कमी होते. सतत सूर्यप्रकाशात राहिल्याने त्वचा आणि ओठ जळू शकतात, ज्याला सनबर्न म्हणतात. ही समस्या क्रिकेटपटूंमध्ये सामान्य आहे. हे पांढऱ्या रंगाचे सनस्क्रीन सूर्यप्रकाशापासून संरक्षण करते आणि त्वचेला थंड ठेवते.

advertisement

हे सुद्धा वाचा : Collagen Benefits: सुंदर त्वचेसाठी कोलेजन वापरता आहात? घ्या ‘ही’ काळजी, जाणून घ्या कोलेजन वापरायची योग्य वेळ?

ओठांना कोरडेपणापासून वाचवण्यासाठी पांढरा लिप बाम:

जास्त वेळ उन्हात राहिल्याने ओठांमधील ओलावा कमी होतो, ज्यामुळे ते फुटण्याची समस्या वाढते. ही समस्या टाळण्यासाठी, क्रिकेटपटू विशेष लिप बाम वापरतात, ज्यामध्ये झिंक ऑक्साईड किंवा इतर मॉइश्चरायझिंग घटक असतात. ते सूर्याच्या UVA आणि UVB किरणांना रोखते. नियमित सनस्क्रीनच्या तुलनेत, ते जास्त काळ टिकते. ते त्वचेवर एक जाड थर तयार करते, जे घामात लवकर विरघळत नाही. त्यात कोणतेही हानिकारक रसायनं नसतात, ज्यामुळे ते त्वचेसाठी सुरक्षित ठरतं.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Zinc Oxide cream benefits: क्रिकेटर तोंडाला काय लावतात? पांढरी क्रीम फॅशनसाठी की सुरक्षेसाठी ? 99 % लोकांना माहिती नाही खरं उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल