TRENDING:

Masoor Dal : मटण - चिकनच्या तोडीस तोड प्रथिनांचा साठा, मसूर डाळ खा, तंदुरुस्त राहा

Last Updated:

शाकाहारी असाल आणि प्रथिनांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी उपाय शोधत असाल तर तुम्ही तुमच्या आहारात डाळींचा समावेश असेलच. त्यातच मसूर डाळीमध्ये चिकन आणि मटणापेक्षा जास्त प्रोटीन असतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मांसाहार करणाऱ्यांना प्रथिनांची कमतरता जास्त भासत नाही. कारण अंडी, चिकन, मटणामध्ये प्रथिनांचा साठा भरपूर असतो. पण तुम्ही शाकाहारी असाल आणि प्रथिनांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी उपाय शोधत असाल तर तुम्ही तुमच्या आहारात डाळींचा समावेश असेलच. त्यातच मसूर डाळीमध्ये चिकन आणि मटणापेक्षा जास्त प्रोटीन असतं.
News18
News18
advertisement

भारतीय घरांमध्ये कडधान्यं, डाळी हा आहाराचा महत्त्वाचा भाग आहेच. डाळींशिवाय जेवण अपूर्ण वाटतं. भारतीयांच्या जेवणांमध्ये कडधान्यं, डाळी असतातच, त्यात मसूर हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो.

मसूर डाळ खाण्याचे फायदे -

1. प्रथिनं -

शाकाहारी लोकांसाठी मसूर प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. शरीरातील स्नायू निर्मितीसाठी आणि स्नायूंच्या दुरुस्तीसाठी प्रथिनं आवश्यक असतात.

advertisement

Scrub : निस्तेज चेहऱ्यासाठी खास स्क्रब, ओट्स, कॉफी, टॉमेटो, मधाचा करा वापर

2. पचन-

तुम्हाला पचनाची समस्या असेल तर मसूर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल, कारण यामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात आढळतं.

3. प्रतिकारशक्ती-

मसूर डाळीमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

Winter Hair Mask : हिवाळ्यात कोरड्या केसांची अशी घ्या काळजी, घरी तयार करा हेअर मास्क

advertisement

4. त्वचा-

मसूरमधील प्रथिनं, जीवनसत्त्वं आणि खनिजं देखील त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

5. ऊर्जा-

मसूर डाळीमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं, जे शरीरातील ऊर्जा पातळी वाढवण्यास मदत करते.

अनेकदा मसूर डाळ खाणं सर्वांनाच सहन होईल असं नाही त्यामुळे, सुरुवातीला थोड्या प्रमाणात खाऊन बघा. मसूर डाळीचं वरण, कोरडी भाजीही करता येते तसंच इतर डाळींमध्ये मिसळूनही मसूर डाळ खाता येते. मसूर डाळीत फायबर जास्त आणि कॅलरी कमी प्रमाणात असतात त्यामुळे मसूर तब्येतीच्या दृष्टीनं चांगला पर्याय आहे. रक्तदाब नियंत्रण, हृदयविकारासंबंधी समस्या कमी करण्यासाठीही मसूर डाळीचा उपयोग होतो.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Masoor Dal : मटण - चिकनच्या तोडीस तोड प्रथिनांचा साठा, मसूर डाळ खा, तंदुरुस्त राहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल