Diwali Skin Care - हे 4 फेस पॅक दिवाळीत तुमची त्वचा उजळवतील, 15 मिनिटांत तुमच्या चेहऱ्यावर येईल चमक
चेहरा उजळ दिसण्यासाठी मुलतानी मातीनं फेस पॅक बनवून लावता येतो. मुलतानी मातीमध्ये झिंक, सिलिका,
ऑक्साइड आणि मॅग्नेशियम सारखी खनिजं असतात. हे त्वचेच्या स्वच्छतेसाठी प्रभावी आहे आणि चेहऱ्यावरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. तेलकट त्वचेसाठी मुलतानी माती विशेषतः फायदेशीर आहे. चमकदार त्वचेसाठी मुलतानी मातीचे 3 फेस पॅक कसे बनवायचे ते येथे जाणून घ्या.
advertisement
मुलतानी माती आणि दही
तुमची त्वचा कोरडी असेल तर मुलतानी मातीचा हा फेस पॅक ग्लो आणि चेहऱ्याच्या आर्द्रतेसाठी वापरून पहा.
फेस पॅक बनवण्यासाठी २ चमचे मुलतानी मातीमध्ये आवश्यकतेनुसार दही मिसळा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे तसाच राहू द्या आणि नंतर धुवा. त्वचेला योग्य ती आर्द्रता मिळते, त्वचा फ्रेश दिसते.
ब्रशने रगडले दात, तरी तोंडाचा येतो वास? हा रोग आतड्यांचा, आजपासूनच उपाय करा!
मुलतानी माती आणि गुलाबजल
मुलतानी माती आणि गुलाबजल हा तयार करण्यासाठी सर्वात सोपा आहे, या फेस पॅकमुळे त्वचेला चांगला ग्लो मिळतो. फेस पॅक बनवण्यासाठी मुलतानी माती आणि गुलाबजल आवश्यकतेनुसार घ्या आणि एकत्र मिसळून पेस्ट बनवा. हा फेस पॅक 20 ते 25 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर धुवा. त्वचा मऊ होते. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाण्यासाठी हा फेस पॅक उपयुक्त आहे.
मुलतानी माती आणि मध
चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी मुलतानी माती आणि मध हा फेस पॅक लावता येतो. चेहऱ्यावर टॅनिंग होत असेल तर त्यावरही मुलतानी मातीचा हा फेस पॅक प्रभावी आहे. हा फेस पॅक बनवण्यासाठी 2 चमचे मुलतानी माती एक चमचा मध आणि आवश्यकतेनुसार पाणी मिसळून फेस पॅक बनवा. हा फेस पॅक चेहऱ्यावर 1 ते 2 मिनिटांसाठी लावून ठेवा आणि नंतर धुवा. चेहरा तजेलदार दिसेल.