ब्रशने रगडले दात, तरी तोंडाचा येतो वास? हा रोग आतड्यांचा, आजपासूनच उपाय करा!

Last Updated:
Oral health : कधीकधी काही लोकांसमोर बसणं खूप कठीण होतं एवढा त्यांच्या तोंडाचा असह्य घाण वास येतो. मग त्यांच्यासोबत बसणं दूरच त्यांच्याशी बोलणं हासुद्धा मोठा टास्कच वाटतो. ते दररोज ब्रश करतात की नाही माहित नाही किंवा ब्रश करूनही त्यांच्या तोंडाचा वास का येतो हेही माहित नाही, असं तुमच्याबाबत कोणी बोलायला नको. त्यामुळे थोडाजरी तोंडाचा वास येत असेल तर आजपासून उपाय करायला सुरुवात करा. आयुर्वेदिक डॉक्टर वीके पांडे यांनी यावर काही रामबाण उपाय सांगितले आहेत. (शिखा श्रेया, प्रतिनिधी / रांची)
1/5
डॉक्टर म्हणाले, काही लोकांसमोर बसून 2 मिनिटं जरी बोललो तरी उलटीसारखं व्हायला लागतं. कदाचित या दुर्गंधीमागे व्यवस्थित ब्रश न करण्यापलिकडेही काही कारणं असू शकतात. एखादा गंभीर आजार असू शकतो. जर तुमच्या स्वत:च्या किंवा जवळच्या व्यक्तीच्या तोंडाचा घाण वास येत असेल तर आताच सतर्क व्हा आणि काळजी घ्यायला सुरुवात करा. कारण हा शरिरात काहीतरी बिघाड असल्याचा संकेत असू शकतो.

advertisement
2/5
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीचं सर्वात मोठं कारण आहे आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये इन्सुलिन पुरवठा व्यवस्थित न होणं किंवा आपल्याला मधुमेह असणं. म्हणजेच येत्या काही दिवसांत आपल्याला या आजारांचा सामना करावा लागू शकतो याचा हा संकेत असतो. तसंच भरपूर टेन्शन घेतल्यानं किंवा भरपूर जंक फूड खाल्लानंही तोंडातून दुर्गंधी येऊ शकते.

3/5
दुसरं कारण म्हणजे पोट साफ न होणं. तुम्हाला जर सतत बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर शरिरातली अस्वच्छता तोंडातून दुर्गंधाच्या रुपात बाहेर पडते. तसंच पायरिया असेल तरीदेखील तोंडातून दुर्गंधी येऊ शकते. पायरिया हा हिरड्यांचा आजार आहे. परंतु कारण काहीही असो आपण घरगुती उपाय करून तोंडाची दुर्गंधी घालवू शकता. 

4/5
डॉ. वी के पांडे यांनी सांगितलं, तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी आवळ्याचा वापर करावा. कच्च्या आवळ्याचे 2-3 काप व्यवस्थित बारीक चावून खावे. यात व्हिटॅमिन सी भरपूर असतं. ज्यामुळे तोंड व्यवस्थित स्वच्छ होतं. तसंच आपण लिंबानं दात आणि जबडा घासू शकता. यामुळेही तोंड स्वच्छ होईल. त्याचबरोबर...

5/5
सकाळी उठल्यावर हलकं कोमट पाणी चमचाभर त्रिफळा चुर्ण घालून प्यावं. यामुळे बद्धकोष्ठतेवर आराम मिळतो. महत्त्वाचं म्हणजे जंक फूड खाणं कमी करावं. दिवसभरात कमीत कमी 45 मिनिटं चालावं. यामुळे शरिरातली घाण घामावाटे बाहेर पडेल आणि पोट साफ राहिल, हळूहळू तोंडाची दुर्गंधी कमी होईल.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement