मुंबई : सध्याच्या काळात केसांच्या समस्येमुळे अनेकजण त्रस्त असतात. बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त तेलांमुळे या समस्यांत वाढच होते. मुंबईतील रंजना दीपक चौगुले यांनी 32 वनस्पतींपासून घरुगुती स्वरुपात एक हेअर ऑईल तयार केलं. स्वतःसाठी आणि मुलीसाठी सुरू केलेला हा प्रयोग आता लघुउद्योगात बदलला आहे. ‘नंदिनी हर्बल हेअर ऑइल’ नावानं हे तेल बाजारात आणलं आहे. एका साध्या घरगुती प्रयोगापासून सुरू झालेल्या या प्रवासाने आज एका यशस्वी लघु उद्योगाचा आकार घेतला आहे. त्यांच्या तेलाची मागणी दिवसेंदिवस वाढत असून नैसर्गिक उत्पादनांचा आग्रह धरलेल्या ग्राहकांनी त्याला जबरदस्त प्रतिसाद दिला आहे.
advertisement
केसांसाठी केमिकलयुक्त उत्पादनांवर नाही विश्वास
रंजना चौगुले यांना सुरुवातीपासूनच केसांच्या नैसर्गिक आरोग्याची विशेष काळजी होती. बाजारात मिळणारी बहुतेक तेलं आणि उत्पादने केमिकलयुक्त असतात, जी काही काळासाठी प्रभावी वाटतात, पण नंतर केसांना नुकसानच करतात. यामुळे केस गळती, कोरडेपणा, दुतोंडी केस, कोंडा यासारख्या समस्या वाढत जातात. त्यामुळे त्यांनी घरच्या घरीच नैसर्गिक घटक वापरून तेल तयार करण्याचा निर्णय घेतला. हा केवळ एक प्रयोग नव्हता, तर केसांच्या आरोग्यासाठी एक जबाबदारी होती. या तेलासाठी त्यांनी 32 प्रकारच्या वनस्पती आणि 6 प्रकारच्या पोषणदायी तेलांचा समावेश केला.
स्वतःसाठी केलेला प्रयोग बनला व्यवसाय
केसांच्या वाढत्या समस्या लक्षात घेऊन रंजना यांनी आपल्या आईची जुनी पद्धत पुन्हा सुरू केली. घरच्या घरी तेल तयार करून त्यामध्ये औषधी वनस्पती वापरून केसांसाठी वापरू लागल्या. स्वतःवर आणि मुलीवर हा प्रयोग केल्यावर केसांची चांगली वाढ होऊ लागली, अस त्यांनी सांगितलं.
हळूहळू त्यांच्या मैत्रिणींनीही हे तेल मागायला सुरुवात केली. एका मैत्रिणीने तर सरळ विचारलं "तू हे विकत का नाही?" रंजना यांना वाटलं की, "बाजारात इतकी तेलं असताना, माझं तेल कोण विकत घेणार?" त्यात हे बनवणं खर्चिक होतं, त्यामुळे जर कोणी घेतलंच नाही तर? पण त्यांच्या मैत्रिणीने स्वतः आणि तिच्या ऑफिसच्या मैत्रिणींसाठी चार बाटल्यांची पहिली ऑर्डर दिली. त्या क्षणाने एका नवीन प्रवासाची सुरुवात झाली. हळूहळू त्यांचं तेल वापरणाऱ्या लोकांची संख्या वाढत गेली. एकदा वापरलेलं तेल लोक परत परत मागू लागले. याच विश्वासावर ‘नंदिनी हर्बल हेअर ऑइल’चा छोटा व्यवसाय सुरू झाला आणि यशस्वी ठरला, असं रंजना सांगतात.
आयुर्वेदाच्या ज्ञानाचा केला वापर, महिलेनं सुरु केलं स्टार्टअप, आता वर्षाला कोटींची उलाढाल
व्यवसायाची सुरुवात आणि वाढ
रंजनाताईंनी सुरुवातीला केवळ वैयक्तिक वापरासाठी हे तेल बनवले. मात्र, मैत्रिणींनी मागणी केल्यानंतर त्यांनी व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. गेल्या 3 महिन्यांपासून हा व्यवसाय सुरू असून, सध्या दरमहा 15 ते 20 बाटल्यांच्या ऑर्डर्स मिळत आहेत. तेलाची किंमत 300 रुपये आहे.
कशामुळे हे तेल खास आहे?
आज बाजारात अनेक हर्बल आणि आयुर्वेदिक म्हणवल्या जाणाऱ्या उत्पादनांची चलती आहे. पण ‘नंदिनी हर्बल हेअर ऑइल’ हे त्याच्या शुद्ध नैसर्गिक आणि पारंपरिक घटकांमुळे वेगळं ठरतं.
या तेलाचे खास वैशिष्ट्ये
1)100 टक्के केमिकल-मुक्त: कोणतेही हानिकारक पदार्थ नाहीत, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे साइड इफेक्ट्स नाहीत.
2) 32 हर्बल घटकांचा समावेश: हिबिस्कस, ब्राह्मी, भृंगराज, आवळा, मेथी, कोरफड आणि इतर पोषणदायी वनस्पती.
3) 6 प्रकारच्या नैसर्गिक तेलांचा वापर: खोबरेल, बदाम, ऑलिव्ह, कडुलिंब, कडधान्य तेल आणि एरंडेल तेल.
4) केसांसाठी संपूर्ण पोषण: केस गळती, विरळ केस, दुतोंडी केस, कोरडेपणा, कोंडा या सर्व समस्यांवर प्रभावी.
5) लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त.
ग्राहकांचा वाढता विश्वास आणि पसंती
सुरुवातीला काही ओळखीच्या लोकांपर्यंत पोहोचलेलं हे तेल आता सोशल मीडियाच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर पोहोचत आहे. प्रत्येक ग्राहकाचा अनुभव हा दुसऱ्यासाठी प्रेरणा ठरत आहे. त्यांच्या प्रवासाने अनेक महिलांना उद्योजकतेसाठी नवी उमेद दिली आहे. केवळ सौंदर्यप्रसाधनांचा व्यवसाय म्हणून नव्हे, तर लोकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त उत्पादने देण्याच्या त्यांच्या ध्येयामुळे ‘नंदिनी हर्बल हेअर ऑईल’ हा ब्रँड अधिक लोकप्रिय होत आहे. केस गळती, कोंडा, विरळ केस यांसारख्या समस्या असणाऱ्या प्रत्येकासाठी ‘नंदिनी हर्बल हेअर ऑइल’ हा एक विश्वासार्ह पर्याय ठरत असल्याचं रंजना सांगतात.