TRENDING:

Hair Care - दिवाळीत घ्या केसांची काळजी, स्ट्रेटनरशिवायही केस दिसतील सरळ, या टिप्सचा नक्की करा वापर 

Last Updated:

कोरफड, आवळा केसांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. केसांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी कोरफड जेल, आवळा हे रामबाण उपाय आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दिवाळीच्या गडबडीत तुम्हाला केसांकडे लक्ष द्यायला वेळ नसेल आणि केस सरळ मुलायम दिसायला हवे असतील तर या टिप्सचा नक्की वापर करा. अनेकदा स्ट्रेटनर वापरुन केस सरळ करतात. पण ते न वापरताही केस सरळ, सुंदर दिसू शकतात. कोरफड किंवा आवळा अनेकदा केसांवर वेगवेगळ्या प्रकारे लावला जातो. जाणून घेऊया, केसांच्या वाढीसाठी आणि केसांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी या दोन्हीचा उपयोग होतो.
News18
News18
advertisement

केसांची निगा राखण्यासाठी अनेक घरगुती वस्तू वापरल्या जातात. केस कमकुवत झाले की ते तुटायला सुरुवात होते. काहीवेळा केस कोरडे होणं आणि पोषणाचा अभाव यामुळे केसांच्या वाढीवरही परिणाम होतो. अशावेळी, कोरफड आणि आवळा अशा दोन्ही गोष्टी केसांची काळजी घेण्यासाठी वापरल्या जातात.

Diwali Skin Care : दिवाळीत करा 5 स्टेप फेशियल, घरच्या घरी घ्या चेहऱ्याची काळजी, पार्लरमध्ये जाण्याचीही गरज नाही

advertisement

कोरफडीचे फायदे -

केसांच्या काळजीसाठी, कोरफड चांगली असते. कोरफडीमध्ये व्हिटॅमिन A, C, E आणि B12 असते. कोरफड हे फॉलिक ॲसिड आणि बीटा कॅरोटीनचाही चांगला स्रोत आहे. डोक्याला लावल्यानं टाळूला त्याचे फायदे मिळतात आणि केस वाढण्यास मदत होते. कोरफड योग्य प्रकारे लावली तर केसांना आवश्यक आर्द्रता मिळते. कोरफडीतील दाहक-विरोधी गुणधर्म देखील टाळूवरील जळजळ दूर करतात. यासाठी कोरफडीचा गर

advertisement

उपयुक्त ठरतो. डोक्यावर लावण्यासाठी ताज्या कोरफडीच्या पानाचा गर काढा. ते टाळूवर घासून अर्धा तास ठेवा आणि नंतर धुवा. कोरफडीपासून हेअर मास्क बनवूनही लावता येतो. यासाठी कोरफडीचा गर घ्या आणि त्यात मध आणि खोबरेल तेल मिसळा आणि केसांना लावा.

Diwali Skin Care - दिवाळीत सुंदर दिसण्यासाठी बनवा अँटी एजिंग फेस मास्क...फक्त 3 गोष्टी वापरा, चेहरा दिसेल सुंदर

advertisement

आवळ्याचे फायदे -

आवळा व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉलचा चांगला स्रोत आहे. व्हिटॅमिन सी समृद्ध आवळ्यामुळे कोलेजनचं उत्पादन सुधारतं आणि यामुळे केसांना फायदा होतो. तसंच आवळा केसांच्या वाढीसाठी पोषक आहे. आवळा केसांना नुकसान होण्यापासून वाचवतो. आवळा वापरल्यानं केसांची वाढ होते आणि केस गळणं कमी होतं. याशिवाय आवळ्यामुळे टाळूलाही फायदा होतो. आवळा नैसर्गिक कंडिशनर आहे. आवळ्याचा रस डोक्याला लावता येतो. आवळ्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे हेअर मास्क बनवून लावता येतात. तुमचे केस जास्त कोरडे असतील तर केसांवर कोरफडीचा गर लावणं जास्त फायदेशीर ठरतं.

advertisement

केस मजबूत करण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी आवळा केसांवर लावला जाऊ शकतो. कारण आवळ्यामुळे केसांची वाढ चांगली होते. आवळा आणि कोरफड हे दोन्ही टाळूचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. या दोन्हीमुळे टाळूची जळजळ कमी होते. त्यामुळे दिवाळीतल्या खास लुकसाठी कोरफड, आवळ्याचा वापर नक्की करा. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा !

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hair Care - दिवाळीत घ्या केसांची काळजी, स्ट्रेटनरशिवायही केस दिसतील सरळ, या टिप्सचा नक्की करा वापर 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल