Diwali Skin Care : दिवाळीत करा 5 स्टेप फेशियल, घरच्या घरी घ्या चेहऱ्याची काळजी, पार्लरमध्ये जाण्याचीही गरज नाही
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
दिवाळीच्या गडबडीत वेळ नसेल तर घरच्या घरी फेशियल करता येईल. कमी वेळात तुमचा चेहरा सुंदर दिसेल. तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याचीही गरज नाही.
मुंबई : दिवाळीत आपण साफसफाईमध्ये इतके व्यस्त होतो की आपण स्वतःची काळजी घेणं विसरु शकतो. खूप थकल्यानं चेहऱ्यावरची चमकही नाहीशी होते. तुमच्याकडेही दिवाळीच्या तयारीनंतर पुरेसा वेळ शिल्लक नसेल आणि पार्लरमध्ये जाऊन फेशियल करायला वेळ नसेल तर चेहरा फ्रेश दिसावा यासाठी घरीच 5 स्टेप फेशियल कसं करायचं त्यासाठीच्या या टिप्स..
advertisement
पहिली पायरी - चेहरा स्वच्छ करा -
सर्व प्रथम, तुमच्या चेहऱ्यानुसार चांगलं क्लिन्जर किंवा दूध वापरा. चेहरा ओला करा आणि क्लिंजर चेहऱ्यावर
advertisement
हलक्या हातानं पसरवा. त्यानंतर 2-3 मिनिटं मसाज करून थंड पाण्यानं धुवा.
दुसरी पायरी - स्क्रबिंग - एक्सफोलिएटिंग
स्क्रबिंगसाठी, आपल्याला 1 चमचा साखर, 1 चमचा मध आणि 1 चमचा लिंबाचा रस आवश्यक आहे.
या सर्व गोष्टी नीट मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि वर्तुळाकार गतीनं मसाज करा. त्यानंतर 5 ते 7 मिनिटांनी पाण्यानं धुवा. यामुळे त्वचेतल्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत होईल.
advertisement
तिसरी पायरी - वाफ घ्या
एका भांड्यात पाणी उकळून त्याची वाफ घ्या. आता 5-10 मिनिटे मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरची
advertisement
छिद्रं उघडतील आणि त्वचा सुधारेल.
चौथी पायरी - फेस पॅक
यासाठी तुम्हाला २ चमचे दही आणि १ चमचा हळद लागेल. या सर्व गोष्टी नीट मिसळा. नंतर चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्यानं धुवा. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होईल.
पाचवी पायरी - मॉइश्चरारायझिंग
मॉइश्चरायझर किंवा ऑलिव्ह ऑइल घ्या आणि चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचा हायड्रेटेड आणि मुलायम राहील.
advertisement
एक महत्त्वाची टीप - फेशियल करण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. तुम्हाला जर तुमच्या त्वचेवर कोणत्याही उत्पादनाची ऍलर्जी असेल तर ते उत्पादन वापरू नका.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2024 7:21 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Diwali Skin Care : दिवाळीत करा 5 स्टेप फेशियल, घरच्या घरी घ्या चेहऱ्याची काळजी, पार्लरमध्ये जाण्याचीही गरज नाही