Skin Care - चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी करा बेसनाचा वापर... फक्त या 2 गोष्टी मिक्स करून चेहऱ्यावर लावा...चेहरा दिसेल तजेलदार

Last Updated:

बेसनाचं पीठ चेहऱ्यावर व्यवस्थित लावलं तर डाग तर दूर होतातच पण त्वचेवरील मृत पेशीही दूर होतात. बेसनासोबत आणखी काही जिन्नस मिसळून फेसपॅक लावला तर चेहरा उजळून निघतो.

News18
News18
मुंबई : दिवाळी सुरु झाली..दिवाळी म्हणजे सगळीकडे लगबग सुरु असते. अशात चेहऱ्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. तुमच्याही घरी लगबग असेल आणि फेशियलसाठी बाहेर जायला वेळ नसेल तर एक घरगुती उपाय तुम्हाला नक्कीच वापरता येईल. स्वयंपाकघरातला एक जिन्नस घराघरात वापरला जातो, याचा उपयोग वर्षानुवर्ष चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी केला जातो. बेसन...आज आपण पाहणार आहोत, फक्त बेसन नाही तर डाग दूर करण्यासाठी बेसनाबरोबर आणखी कोणत्या गोष्टी वापरल्या तर त्याचा उपयोग चेहऱ्यासाठी होऊ शकतो. बेसनाचं पीठ चेहऱ्यावर व्यवस्थित लावलं तर त्वचेवर चमक येते.
बेसन वापरणं त्वचेसाठी फायदेशीर आहे. बेसनाचं पीठ चेहऱ्यावर व्यवस्थित लावलं तर डाग तर दूर होतातच
पण त्वचेवरील मृत पेशीही दूर होतात. बेसन त्वचेवर साचलेली घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकतं. यामुळे
टॅनिंग कमी होतं आणि त्वचा मऊ होते. बेसनाचा परिणाम त्वचेची पीएच पातळी सुधारण्यावरही दिसून येतो.
पाहूयात बेसनाचे फेस पॅक कसे बनवायचे...
advertisement
बेसन, दही आणि हळद -
बेसनामध्ये आवश्यकतेनुसार दही आणि चिमूटभर हळद मिसळून फेस पॅक तयार करता येतो. हा फेस मास्क
15 ते 20 मिनिटं चेहऱ्यावर ठेवल्यानंतर तो धुवून काढता येतो. यामुळे चेहऱ्याला पुरेशी आर्द्रताही मिळते आणि त्वचेचे डाग आणि टॅनिंग कमी होऊ लागतं.
advertisement
बेसन आणि कोरफड -
कोरफडीतील अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वं आणि खनिजं त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. एक चमचा बेसन घेऊन त्यात एक चमचा एलोवेरा जेल घाला. तयार केलेली पेस्ट मिक्स करून 10 मिनिटं चेहऱ्यावर लावा
आणि नंतर चेहरा धुवून स्वच्छ करा. हा फेस पॅक आठवड्यातून 2 ते 3 वेळा चेहऱ्यावर लावता येतो.
advertisement
बेसन आणि मुलतानी माती -
तेलकट त्वचेसाठी हा फेस पॅक खूप फायदेशीर आहे. त्यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघतं. एका भांड्यात दोन चमचे मुलतानी माती घ्या आणि त्यात एक चमचा बेसन घाला. ते मिसळा आणि पाणी टाकून पेस्ट तयार करा. हा फेस पॅक 20 मिनिटं चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर धुवा. हा फेस पॅक आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर लावता येतो.
advertisement
बेसन आणि टोमॅटो -
चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी टोमॅटो आणि बेसनचा हा फेस पॅक वापरून पहा. फेस पॅक बनवण्यासाठी टोमॅटो बारीक करून त्यात बेसन मिक्स करून फेस पॅक तयार करा. ते चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटं ठेवा आणि नंतर हलक्या हातानं धुवा. चेहऱ्यावर साचलेली घाण बाहेर पडू लागेल.
या सोप्या टिप्सचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. कोणतंही नवीन उत्पादन चेहऱ्यावर लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Skin Care - चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी करा बेसनाचा वापर... फक्त या 2 गोष्टी मिक्स करून चेहऱ्यावर लावा...चेहरा दिसेल तजेलदार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement