डायबिटीस झालेल्या रूग्णांनी वेळेवर गोळ्या औषधं घेतली नाहीत तर रक्तातली साखर प्रमाणाबाहेर वाढून गंभीर आजारांचा सामाना करावा लागू शकतो. इतकंच काय डायबिटीस प्रमाणाबाहेर गेला तर गोळ्या औषधं सुद्धा काम नाही करत अशा व्यक्तींना दरवेळी काही खाण्याआधी इन्सुलिनची इंजेक्शनं घ्यावी लागतात. त्यामुळे डायबिटीसला नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांव्यतिरिक्त, खाण्याच्या सवयींकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तुम्हाला डायबिटीस झाला असेल आणि तो नियंत्रणात ठेवायचा असेल तर कडुलिंबाची पानं ही तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात. तुम्ही दररोज 4 ते 5 कडुलिंबाची पानं खाल्ली तर तुमचा वाढलेला डायबिटीस हा नियंत्रणात राहायला मदत होऊ शकेल.
advertisement
जाणून घेऊयात कडुलिंबाच्या पानांचे आरोग्यदायी फायदे
आयुर्वेदात, कडुलिंबाच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पानांमध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत. जे अनेक आजारांपासून आराम देऊ शकतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कडुलिंबाची पाने कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाहीत. कारण कडुलिंबाच्या पानांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्मांनी आढळून येतात. कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेल्या कडू आणि तुरट रसामुळे या पानांची चवही कडसर असते. जेव्हा आपण कडुलिंबाची पानं चावून खातो तेव्हा हा कडू, तुरट रस आपल्या रक्तात जाऊन रक्तातला गोड रस म्हणजेच साखरचं प्रमाण नियंत्रित करायला मदत करतो. कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक शक्तिशाली फ्लेव्होनॉइड्स असतात, जे स्वादुपिंडाला उत्तेजित करतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या इन्सुलिनचं प्रमाण वाढायला मदत होते. ज्यामुळे रक्तातील साखर आपसूकच नियंत्रणात राहते. विविध त्वचा रोगांवरही कडुलिंबाची पानं खाणं फायद्याची ठरू शकतात.
अशी ‘खा’ कडुलिंबाची पानं
आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात की, कडुलिंबाची पानं आरोग्यासाठी तेव्हाच फायदेशीर ठरू शकतात जेव्हा ती योग्य पद्धतीने खाल्ली जातात. तुम्ही डायबिटीस नियंत्रित ठेवण्यासाठी कडुलिंबाची पानं खाणार असाल तर सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी 4 ते 5 कडुलिंबाची पानं चावून खाणं फायद्याचं ठरतं. यानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता. अनेक जण कडुलिंबाच्या कडू चवीमुळे पानं खाणं टाळतात. अशा व्यक्ती कडुलिंबाचं तेल वापरू शकतात. कडुलिंबाच्या तेलाच्या सेवनानेही मधुमेह नियंत्रित होण्यास देखील मदत होते. कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेली नैसर्गिक संयुगं त्वचेच्या आजारांपासून आराम देऊ शकतात. तथापि, ज्यांना डायबिटीसचा गंभीर त्रास आहे किंवा ज्यांना इन्सुलिन घ्यावं लागतं अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्लाने कडुलिंबाची पाने खावीत. गर्भवती महिला, वृद्ध आणि मुलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कडुलिंबाची पानं खाऊ नयेत.
हे सुद्धा वाचा: Exercise for diabetes डायबिटीसला दूर करायचं आहे, मग करा करा ‘हे’ साधे सोपे व्यायाम
