अंतर्गत आणि बाह्य दोन्ही प्रकारे काळजी घेतली तरच केसांचं आरोग्य चांगलं राहतं. केवळ बाह्य गोष्टी केसांवर परिणाम करत नाहीत तर अंतर्गत समस्या देखील केसांच्या आरोग्यात बिघाड निर्माण करू शकतात. अशा वेळी केसांना अंतर्गत पोषण देण्यासाठी चांगला आहार घेणं महत्वाचं आहे.
त्वचा आणि केस तज्ज्ञ त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सुगन्या नायडू अशा काही पदार्थांचं महत्त्व सांगितलं आहे. या घटकांमुळे केसांना अंतर्गत पोषण मिळतं, केसांची वाढ चांगली होते आणि केस लांब वाढण्यासही मदत होते.
advertisement
Uttanasan : खूप वेळ बसून काम करताय ? ब्रेकमधे हे योगासन करा, तुम्हाला वाटेल फ्रेश
लोहाची कमतरता
लोहाची कमतरता म्हणजे केसांच्या मुळांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणं. यामुळे केस कोरडे आणि ठिसूळ दिसतात. लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, आहारात बीट, पालक, मेथीचे दाणे, डाळिंब आणि खजूर यांचा समावेश करा.
प्रथिनांचा पुरवठा
प्रथिनं मिळविण्यासाठी, मसूर, पनीर, टोफू, अंडी, अंकुरलेलं धान्य आणि बाजरी भरपूर प्रमाणात खा. प्रथिनं खाल्ली नाहीत तर केसांच्या निर्मितीमध्ये समस्या येतील. केस दुरुस्त करण्यासाठी आणि नुकसान दूर ठेवण्यासाठी देखील प्रथिनं आवश्यक आहेत.
झिंक - जस्त
भोपळ्याच्या बिया, सूर्यफूलाच्या बिया, बदाम आणि अक्रोड खाल्ल्यानं शरीराला चांगल्या प्रमाणात झिंक मिळतं.
व्हिटॅमिन डी
व्हिटॅमिन डी केसांसाठी देखील आवश्यक आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे केस गळतात. सकाळचा सूर्यप्रकाश यासाठी आवश्यक आहे. अंड्याचा पिवळा भाग खा आणि आहारात मशरूमचा समावेश करा.
Liver : यकृतासाठी या उत्तम पदार्थांशी करा दोस्ती, फॅटी लिव्हरला करा बायबाय
व्हिटॅमिन बी 12
व्हिटॅमिन बी 12च्या कमतरतेचा केसांवरही परिणाम होतो. म्हणूनच आहारात या व्हिटॅमिनचा समावेश करणं महत्वाचं आहे. अंडी, दुग्धजन्य पदार्थ, मासे आणि चिकन खाल्ल्यानं व्हिटॅमिन बी 12 मिळतं.
या गोष्टीही लक्षात ठेवा
- आठवड्यातून एकदा कोमट तेलानं केसांना मसाज करणं फायदेशीर आहे.
- केसांना नुकसान करणाऱ्या रासायनिक उत्पादनांपासून दूर रहा.
- केसांसाठी जास्त गरम उपकरणं वापरू नका. यामुळे केसांचं नुकसान होतं.
- केसांच्या खोल कंडिशनिंगसाठी आठवड्यातून एकदा हेअर मास्क लावाता येईल.
- केसांच्या प्रकारानुसार हेअर मास्क आणि शाम्पू निवडा.
