आहार तज्ज्ञांच्या मते, जेवणापूर्वी अर्धा लीटर कोमट पाणी प्यायल्यानं चयापचय क्रियेचा वेग 24 ते 30 टक्क्यांनी वाढू शकतो.
अन्न पचण्यापासून ते शरीराची अंतर्गत शुद्धी आणि रक्ताभिसरण योग्य राखण्यापर्यंत पाणी पिणं शरीरासाठी खूप आवश्यक आहे. शरीराच्या पोषणासाठी पुरेशा प्रमाणात अन्न आणि पाणी पिण्याची गरज आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील अनेक कामं योग्य प्रकारे पूर्ण होत नाहीत, त्यामुळे अनेक प्रकारचे आजार माणसाला घेरतात. योग्य प्रमाणात पाणी न पिणं आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.
advertisement
पौष्टिक आहाराव्यतिरिक्त पाणी पिण्याच्या पद्धतीबद्दलही चर्चा आपण ऐकत असतो. आधी पाणी प्यायल्यानं पोट भरतं का ? मग पाणी प्यावं की पिऊ नये ? जेवण करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते का? याचं अचूक उत्तर पोषणतज्ज्ञ देतात. जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा नंतर पाणी पिणं हे जेवताना पिण्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त फायदेशीर आहे.
Gasses - Acidity: गॅस, ॲसिडिटीच्या त्रासामुळे वैतागलात ? या सवयी बदला, नक्की होईल फायदा
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा नंतर पाणी प्यायल्यानं शरीरातील चयापचय क्रिया सुधारते, ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास खूप मदत होते. त्याच वेळी, जेवण करण्यापूर्वी सुमारे दोन ग्लास पाणी प्यायल्यानं अनावश्यक जास्त खाण्याची सवय सुटण्यास मदत होते. यामुळे लठ्ठपणा आणि वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणं तुलनेनं सोपं जातं. जेवणाच्या अर्धा तास आधी पुरेसं पाणी प्यायल्यानं पोट भरल्यासारखं वाटतं आणि अन्न खाण्याचं प्रमाण कमी होतं. यामुळे शरीराला कमी कॅलरीज मिळतात आणि वजन कमी करण्याच्या अंतर्गत प्रक्रियेला वेग येतो.
जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेलं पाणी जर योग्य प्रमाणात प्यायलं नाही तर त्याचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन होणं शरीरासाठी घातक आहे. जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सक्रिय होते आणि शरीरातील चरबी आणि साखरेचं शोषण नियंत्रित होतं. तसंच, अन्न खाण्यापूर्वी पाणी पिणं तुम्हाला कोल्ड्रिंक्स, सोडा, ज्यूस पिण्यापासून प्रतिबंधित करतं.
Joints Pain in Winter : हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढला ? या पद्धती वापरुन पाहा, त्रास होईल कमी
आहार तज्ज्ञांच्या मते, जेवण करण्यापूर्वी अर्धा लीटर कोमट पाणी प्यायल्यानं चयापचय वेग 24 ते 30 टक्क्यांनी वाढू शकतो. यामुळे पचन सुधारतं, आणि पुढे अन्न आल्यावर पचनासाठी शरीर तयार होतं, कॅलरी बर्न होण्यासाठी याची मदत होते. या शारीरिक हालचाली वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला गती देतात. मात्र, अचानक जास्त पाणी प्यायल्यानं पोटाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे लठ्ठपणा आणि वाढतं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी जेवणापूर्वी पाणी पिण्याव्यतिरिक्त आहार आणि जीवनशैलीत आणखी काही महत्त्वाचे बदल करायला हवेत.
