ओट्समध्ये कमी कॅलरीज, अधिक फायबर असतात तसेच ओट्स हे नैसर्गिक, कमी प्रक्रिया केलेले धान्य आहे. यामध्ये बिटा-ग्लुकन नावाचं फायबर असतं, जे भूक कमी करतं आणि पचन सुधारतं. साधे ओट्स दुधात किंवा पाण्यात शिजवून, फळं घालून खाल्ले तरी ते वजन कमी करण्यास खूप मदत करतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओट्समध्ये साखर नसते, असं स्नेहा परांजपे सांगतात.
advertisement
Kidney Health : शरीरातील 'या' बदलांकडे करू नका दुर्लक्ष, किडनी खराब झाल्याचे असू शकते लक्षण
तसेच मुसली ही ओट्स, ड्रायफ्रूट्स, बीजं आणि काहीवेळा मध किंवा साखरेचं मिश्रण असते. तिच्यात फायबर आणि पोषणमूल्य नक्कीच जास्त असतं, पण पॅकेटबंद मुसलीमध्ये साखरेचं प्रमाण अधिक असू शकतं. चवदार असली तरी वजन कमी करताना तिचा वापर विचारपूर्वक करावा लागतो. होममेड मुसली किंवा लो-शुगर मुसली वापरल्यास ती एक चांगला पर्याय ठरतो.
तुम्ही वजन कमी करण्याच्या उद्देशाने नाश्ता शोधत असाल तर ओट्स हा अधिक प्रभावी पर्याय आहे. त्यात साखर नाही, फायबर जास्त आहे आणि तो पोटभरही राहतो. म्युसली वापरायचीच असेल तर लेबल नीट वाचा अॅडेड शुगर टाळा आणि घरचीच मुसली खा, असं स्नेहा परांजपे सांगतात.