TRENDING:

Organ Donation Day 2025: तुम्हाला माहितीये का? अवयव दान केल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला कसं मिळतं?

Last Updated:

सध्या अवयवदान करण्याची खूप गरज आहे आणि याबद्दल जागृती करण्याची खूप गरज आहे. कारण की आपण जर कोणाला आपले अवयव दिले तर त्यामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : 13 ऑगस्ट हा दिवस जागतिक अवयव दिन (ऑर्गन डोनेट डे) म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सध्या अवयवदान करण्याची खूप गरज आहे आणि याबद्दल जागृती करण्याची खूप गरज आहे. कारण की आपण जर कोणाला आपले अवयव दिले तर त्यामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो. पण आपण हे दान करताना काय काळजी घेतली पाहिजे? अवयवदान कोण करू शकतो किंवा कोण करू शकत नाही? याविषयी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कमलाकर मुतखेडकर सांगितलेली आहे.
advertisement

अवयवदान कुठलीही निरोगी व्यक्ती करू शकते. त्यासाठी तुम्ही निरोगी असणे खूप गरजेचे आहे म्हणजेच की जर तुम्हाला कोणाला अवयवदान करायचे असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार हा नसला पाहिजे. नात्यात अवयवदान करणे खूप सोपे जाते. म्हणजेच की जर आपल्याला रक्ताच्या नात्यांमध्ये कोणाला किडनी, लिव्हर किंवा इतर कशाची गरज पडली तर आपण ते त्यांना देऊ शकतो. अवयवदान करताना सर्व चाचण्या करून, सर्व टेस्ट करूनच हे आपण करू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

advertisement

Health Tips: लठ्ठपणा कमी करायचा? हे 7 घरगुती उपाय पाहाच, खर्चही कमी!

दुसरा महत्त्वाचा म्हणजे असे की जे जिवंत व्यक्ती आहेत ते अवयवदान करू शकतात. पण जर कोणी ब्रेन डेड झाला असेल तर अशा व्यक्तींचे सर्वच अवयव आपण दान करू शकतो. जसे की त्यामध्ये हृदय, किडनी, लिव्हर, डोळे, फुफ्फुस हे सर्व आपण दान करू शकतो.

advertisement

पण त्यासाठी ब्रेन डेड झालेला व्यक्ती हा निरोगी असणे देखील गरजेचे आहे म्हणजेच की त्याला कुठल्याही प्रकारचा आजार हा नसला पाहिजे. तसेच ज्यांना आजार आहेच म्हणजेच की एखाद्या व्यक्तीला शुगर आहे किंवा हृदयासंबंधी कुठला आजार आहे, कावीळ झालेला असेल किंवा कर्करोगासारखा आजार होऊन गेला असेल तर असे व्यक्ती आपले अवयव हे दान करू शकत नाहीत.

advertisement

जर तुम्हाला अवयवदान करायचे असेल तर तुम्ही त्यासाठी फॉर्म देखील भरू शकता. म्हणजेच की मृत्यूपूर्वी देखील तुम्ही अवयवदान करण्यासाठी फॉर्म भरू शकता यासाठी तुम्हाला सरकारची नोटो नावाची एक वेबसाईट आहे त्यावरती जाऊन तुम्ही या संदर्भात फॉर्म हा भरू शकता. तसेच जर कोणी फॉर्म नसेल भरला तरी देखील अशी व्यक्ती आपले अवयवदान हे करू शकते. ब्रेन डेड व्यक्ती असेल तर त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने हे सर्व करता येऊ शकते, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

advertisement

अवयवदान करण्यासाठी जास्तीत जास्त जनजागृती करणे गरजेचे आहे. कारण की आपल्या समाजामध्ये अजून देखील या संदर्भात पाहिजे तशी जनजागृती झालेली नाही आहे. आपण जर अवयव दान केले तर त्यामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो. त्यामुळे सर्वांनी या संदर्भात जागरूक होणे गरजेचे आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Organ Donation Day 2025: तुम्हाला माहितीये का? अवयव दान केल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला कसं मिळतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल