TRENDING:

पनीर आणि टोफूमध्ये काय फरक? आरोग्यासाठी काय खाणं बेस्ट? Video

Last Updated:

पनीर आणि टोफू हे दोन्ही खाणं आपल्या शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतं. दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणातून पोषक घटक आपल्या शरिराला मिळत असतात. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी  
advertisement

छत्रपती संभाजीनगर : पनीर आणि टोफू हे दोन्ही खाणं आपल्या शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतं. दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणातून पोषक घटक आपल्या शरिराला मिळत असतात. पण टोफू की पनीर या दोन्हीपैकी काय खायचं? या दोन्हीपैकी काय खाल्ल्यामुळे आपल्याला जास्त पोषक घटक मिळतात? काय खाणं चांगलं आहे? याविषयीचं आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी माहिती सांगितलेली आहे. 

advertisement

पनीर आणि टोफू काय खावं? 

पनीर आणि टोफू या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक आणि प्रोटीन असतं. पनीर हे दुधापासून तयार होतं आणि टोफू हा सोयाबीनच्या दुधापासून तयार होतो. या दोन्हीमध्ये वेगवेगळे असे घटक आहेत. टोफूमधून भरपूर प्रमाणात आपल्या शरिराला प्रोटीन मिळतं. जर तुम्हाला पनीर खायचं असेल पण ते पनीर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे खाणं गरजेचं आहे कारण की सध्याला बाजारामध्ये भेसळयुक्त पनीर मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे तुम्ही पनीर हे चांगल्याच क्वालिटीचा खावा नाहीतर तुम्ही घरी देखील पनीर तयार करू शकता, असं आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर सांगतात. 

advertisement

Summer Tips: कलिंगड फ्रिजमध्ये ठेऊन खाताय? उन्हाळ्यात अजिबात करू नका ही चूक, आरोग्याला धोका!

त्याचप्रमाणे टोफू देखील जर तुम्हाला खायचा असेल तर तो देखील तुम्ही अत्यंत चांगल्या क्वालिटीचा घेणे गरजेचे आहे. टोफू हा सोयाबीनपासून तयार केला जातो. टोफूमध्ये फॅटचं प्रमाण हे पनीरपेक्षा कमी असतं. पनीरपेक्षा जास्त प्रमाणात फायबर हे टोफूमध्ये असतं. ज्यांना प्रथिनांची कमतरता आहे ते सर्वजण आपल्या आहारामध्ये टोफूचा समावेश करू शकतात. कारण की टोफू हा सोयाबीन वरती प्रक्रिया करून तयार केला जातो. तसंच ज्या लोकांना दुधाची एलर्जी आहे अशी लोक पनीर ऐवजी टोफूचा समावेश आपल्या आहारात करू शकतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

पण तुम्ही टोफू आणि पनीर खाताना दोन्हीही प्रमाणामध्येच खावं. त्याचा अतिरेक हा करू नये कारण की जर तुम्ही याचा जास्त अतिरेक केला तर त्यामुळे त्याचे दुष्परिणाम देखील तुमच्या शरिरावर होऊ शकतात, असं आहार आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी सांगितलं. 

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
पनीर आणि टोफूमध्ये काय फरक? आरोग्यासाठी काय खाणं बेस्ट? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल