जयपूर : पावसाळ्यात आजूबाजूला दमट वातावरण असल्यामुळे साथीचे आजार झपाट्यानं पसरतात. पावसात घराबाहेर पडताना आपण छत्री घेऊन निघतो, काहीजण पूर्ण अंग झाकावं यासाठी रेनकोट वापरतात. परंतु छत्री असो किंवा रेनकोट असो, पावसाच्या पाण्यात पायांचे तळवे भिजतातच. जर आपले पाय साचलेल्या पाण्याच्या किंवा सांडपाण्याच्या संपर्कात आले, तर त्यातले विषाणू आपल्या तळव्यांना चिकटून इन्फेक्शन होऊ शकतं.
advertisement
यातूनच अनेकजणांना पावसाळ्यात पाय कुजण्याचा त्रास होतो. यात तळव्यांना खूप खाज येते, तळव्याच्या त्वचेवर फोड येतात, त्यात पाणी तयार होतं, त्याचा घाण वास येतो, हळूहळू त्यातून रक्त येऊ लागतं. मग मात्र अगदी पावसाळा संपून थंडी सुरू झाली तरी ही जखम काही सहजासहजी भरून निघत नाही. म्हणूनच यावर वेळीच उपचार करणं आवश्यक आहे.
हेही वाचा : गाडीतून जाणं सहनच होत नाही, सतत मळमळतं? प्रवासात सोबत असूद्या 1 पदार्थ
पावसात घराबाहेर पडताना पूर्ण पाय झाकतील आणि आत पाणी शिरणार नाही, असे बूट वापरावे. तुम्ही बराच वेळ मोजे किंवा बूट वापरत असाल, तर पायांची त्वचा मऊ, संवेदनशील होते, जिला लगेच इंफेक्शन होऊ शकतं. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने पाय मोकळे करा, शक्यतो स्वच्छ धुवून सुकवा.
आंघोळ करताना दररोज संपूर्ण पाय साबणाने स्वच्छ धुवावे. त्यानंतर पाय एवढे पुसावे की, बोटांच्या मधल्या भेगांमध्येही ओलावा राहायला नको. शिवाय नखंसुद्धा कापलेली असायला हवी, नाहीतर त्यात बुरशी होऊ शकते. भिजलेले मोजे तसेच घालून राहू नये. अशी काळजी घेतल्यास आपले पाय पावसाळाभर माऊ राहू शकतात आणि अगदी पेडिक्युअर केल्यासारखे चमकू शकतात.