या सवयी सतत तशाच असतील तर कालांतरानं, शरीराच्या नैसर्गिक ऊर्जा चक्रात, संप्रेरक पातळीत आणि मानसिक पातळीवरही त्या व्यत्यय आणू शकतात. त्यामुळे, तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, तर तुमच्या जीवनशैलीत काही आवश्यक आणि सकारात्मक बदल करणं गरजेचं आहे.
- झोपेचे वेळापत्रक निश्चित करा.
झोपण्याची वेळ कमी करणं आणि रात्री उशिरापर्यंत जागण्यानं तुमच्या झोपेचं चक्र बिघडतं आणि आरोग्याची ठरलेली लय कोलमडते. यासाठी झोपेची आणि जागं होण्याची वेळ ठरवून घ्या. 7-8 तास चांगली झोप ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. झोपेच्या किमान तीस मिनिटं आधी स्क्रीनचा वापर मर्यादित ठेवा.
advertisement
Fatty Liver : फॅटी लिव्हरची लक्षणं ओळखा, वेळीच यकृताच्या आरोग्याकडे लक्ष द्या
- पाणी पिण्यास सुरुवात करा
अनेक जण दिवसाची सुरुवात डिहायड्रेटेड असतानाच करतात, ज्यामुळे सुस्ती येणं आणि डोकेदुखी होऊ शकते. उठल्यानंतर लगेच एक ग्लास पाणी प्या आणि दिवसभर हळूहळू पाणी पित राहा. डिहायड्रेशन हे सततच्या थकव्याचं एक सामान्य पण दुर्लक्षित कारण आहे.
- न्याहारी करा
दिवसाच्या सुरुवातीला पोषक खाणं आवश्यक आहे. खाणं वगळल्यानं रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. कर्बोदकं, प्रथिनं आणि निरोगी चरबीयुक्त पौष्टिक नाश्त्यामुळे शरीराला सतत ऊर्जा मिळत राहते आणि दिवसभर चयापचय चांगलं राहतं.
- सक्रिय रहा.
सक्रिय राहत नसल्यामुळे सतत थकवा येऊ शकतो. दिवसातून फक्त 20-30 मिनिटं व्यायाम - जलद चालणं, स्ट्रेचिंग किंवा योगा यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. मूड सुधारू शकतो आणि मेंदू आणि स्नायूंत रक्त प्रवाह सुधारू शकतो.
- दुपारनंतर कॅफिनचे सेवन कमी करा.
दुपारी जागं राहण्यासाठी कॉफीवर अवलंबून राहिल्यानं रात्रीची झोप बिघडू शकते. दुपारनंतर कॅफिनचं सेवन मर्यादित करा.
-साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खा
प्रक्रिया केलेले पदार्थ, गोड पदार्थ खाणं टाळा. ऊर्जेची पातळी राखण्यासाठी फळं, भाज्या, सुका मेवा खा.
Hair fall : केसगळती रोखण्यासाठी औषधं नाही, आधी आहारात बदल करा, लोहाची कमतरता असू शकतं कारण
- स्क्रीन टाईमकडे लक्ष द्या.
रात्रीच्या वेळी जास्त स्क्रीन्सच्या संपर्कात राहिल्यानं मेलाटोनिनच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो आणि झोपेत व्यत्यय येऊ शकतो. निळ्या प्रकाशाचा फिल्टर वापरा, नियमित ब्रेक घ्या आणि झोपण्यापूर्वी स्क्रीनचा वापर मर्यादित करा.
- लहान ब्रेक घ्या.
मानसिक थकवा अनेकदा शारीरिक थकव्यात रूपांतरित होतो. दर 60-90 मिनिटांनी, कामांतून ब्रेक घ्या. स्ट्रेचिंग करा, खोल श्वास घ्या किंवा मानसिकरित्या ताजेतवानं आणि रिचार्ज होण्याचा प्रयत्न करा.
- दररोज थोडा वेळ सूर्यप्रकाश अंगावर घ्या
नैसर्गिक प्रकाशामुळे व्हिटॅमिन डीची पातळी वाढते, यामुळे ऊर्जा वाढते. दररोज विशेषतः सकाळी किमान 15-30 मिनिटं बाहेर घालवण्याचा प्रयत्न करा.