केशर हे अनेक आरोग्य फायद्यांसाठी ओळखलं जातं. त्वचा आणि केसांसाठीही केशर खूप फायदेशीर आहे. याशिवाय, केशरमध्ये भरपूर जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात ज्यामुळे पचनास मदत होते, केशरामुळे त्वचेवरची चमकही कायम राहते.
अँटिऑक्सिडंटनं समृद्ध
केशरी रंगाच्या केशराच्या जातींमध्ये क्रोसेटिन, क्रोसिन आणि सॅफ्रानल यासह शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असतात. हे अँटिऑक्सिडेंट तुमच्या पेशींसाठी उपयुक्त आहे.
advertisement
स्मृती
स्मरणशक्ती सुधारण्यासाठी केशर उपयुक्त आहे. मानसिक आरोग्यासाठीही केशर उपयुक्त आहे.
हृदय आरोग्य
केशरामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट असतात, ज्यामुळे एलडीएल कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स, एकूण कोलेस्ट्रॉल
आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. यामुळे रक्तवाहिन्यांमधील अडथळा टाळण्यास मदत होते,
ज्यामुळे हृदय निरोगी राहतं.
Fitness Secrets : सकारात्मक विचार करा, स्वत:वर विश्वास ठेवा, व्यक्तिमत्वाची स्वतंत्र ओळख जपा
वजन नियंत्रण
केशरामुळे भूक लागते. अति खाण्याचं प्रमाण कमी करण्यास यामुळे मदत होते, ज्यामुळे पोटाची
अतिरिक्त चरबी कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
त्वचा
सौंदर्य वाढवण्यासाठी केशर हा एक उत्तम घटक आहे. यामुळे त्वचा चमकदार होते, मुरुम आणि जळजळ कमी होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्येही याचा समावेश करावा.
