Winter Care :  हिवाळ्यात या 5 गोष्टींनी करा चेहऱ्याला मसाज, त्वचेचा कोरडेपणा होईल दूर, चेहऱ्यावर येईल चमक

Last Updated:

हिवाळ्यातल्या हवेमुळे त्वचा कोरडी होते. काही वेळा कोरडेपणामुळे चेहऱ्यावर खाज येते. पण काही खास गोष्टींनी चेहऱ्याचा मसाज केला तर तुमची त्वचा ओलसर राहते आणि या आर्द्रतेमुळे चेहऱ्यावरची चमक टिकू शकते. 

News18
News18
मुंबई : हिवाळ्यातल्या हवेमुळे त्वचा कोरडी होते. काही वेळा कोरडेपणामुळे चेहऱ्यावर खाज येते. पण काही खास गोष्टींनी चेहऱ्याचा मसाज केला तर तुमची त्वचा ओलसर राहते आणि या आर्द्रतेमुळे चेहऱ्यावरची चमक टिकू शकते.
हिवाळ्यात, थंड आणि कोरड्या वाऱ्यामुळे त्वचेचा कोरडेपणा वाढतो, ज्यामुळे चेहरा निस्तेज आणि निर्जीव दिसू शकतो. पण, तुम्ही काही खास गोष्टींनी तुमच्या चेहऱ्यावर मसाज केला तर तुमची त्वचा मॉइश्चराइज राहू शकते आणि तुमचा चेहरा चमकू शकतो.
हिवाळ्यात फेशियल मसाजसाठी काय वापरावं ?
नारळ तेल - हिवाळ्यात चेहऱ्यासाठी हे सर्वोत्तम तेल आहे. थंड हवामानात तुमच्या कोरड्या त्वचेवर ओलावा टिकवून ठेवण्यासाठी हे उत्तम आहे. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला निरोगी ठेवतात.
advertisement
रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेलाचे काही थेंब हातावर घेऊन हळूवारपणे चेहऱ्याला मसाज करा आणि रात्रभर तसाच राहू द्या, नंतर सकाळी धुवा.
बदामाचं तेल -
बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात, जे त्वचेला हायड्रेट आणि मुलायम ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. तेलाचे 4 ते 5 थेंब तळहातावर घ्या आणि 10 मिनिटं चेहऱ्याची मालिश करा. त्यानंतर ओल्या सुती कापडानं चेहरा स्वच्छ करा.
advertisement
दही
हिवाळ्यात दह्याच्या मदतीनं तुम्ही तुमची त्वचा हायड्रेट करु शकता. फक्त 1 चमचा दही घेऊन चेहऱ्यावर हलक्या हातानं मसाज करा आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी कोमट पाण्यानं चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा.
मध
कोरडी त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मध देखील पुरेसा आहे. मध त्वचेला खोलवर आर्द्रता पोहचवू शकतो. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला चमकदार बनवतात.
advertisement
ऑलिव्ह ऑइल
हिवाळ्यात तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचाही पर्याय आहे. त्यात व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स देखील असतात. या तेलानं 20 ते 30 मिनिटं मसाज केल्यानंतर कोमट पाण्यानं त्वचा पूर्णपणे स्वच्छ करा. सकाळी चेहरा फ्रेश दिसेल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Winter Care :  हिवाळ्यात या 5 गोष्टींनी करा चेहऱ्याला मसाज, त्वचेचा कोरडेपणा होईल दूर, चेहऱ्यावर येईल चमक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement