Fitness Secrets : सकारात्मक विचार करा, स्वत:वर विश्वास ठेवा, व्यक्तिमत्वाची स्वतंत्र ओळख जपा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
योग्य दिनचर्या, खाण्याच्या योग्य सवयी आणि सकारात्मक विचारसरणी जपली तर तुमचं व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळं ठरेल हे नक्की. यासाठी पाच सोप्या गोष्टी तुम्ही करु शकता, ज्याद्वारे तुम्ही नकारात्मकतेवर मात करु शकता.
मुंबई : योग्य दिनचर्या, खाण्याच्या योग्य सवयी आणि सकारात्मक विचारसरणी जपली तर तुमचं व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळं ठरेल हे नक्की. यासाठी पाच सोप्या गोष्टी तुम्ही करु शकता, ज्याद्वारे तुम्ही नकारात्मकतेवर मात करु शकता.
advertisement
1. निरोगी आणि संतुलित आहार
काय खावं: ताजी फळं, भाज्या, सुका मेवा. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वं
त्वचेचं तारुण्य राखतं.
काय खाऊ नये: प्रक्रिया केलेले अन्न - Processed food , जास्त साखर आणि तळलेलं
अन्न. यामुळे शरीर आतून कमकुवत होतं आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वाढतात.
advertisement
हायड्रेशन: दिवसभरात किमान 8-10 ग्लास पाणी प्या. तुमची त्वचा हायड्रेटेड आणि चमकदार राहील.
2. नियमित व्यायाम करा.
योगाभ्यास: व्यायाम करा.चेहऱ्याच्या स्नायूंना टोन करण्यासाठी फेस योगा करा.
advertisement
कार्डिओ: तुमचं हृदय आणि फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी चाला, जॉगिंग किंवा नृत्य करा.
मसल टोनिंग: स्नायूंसाठी वेटलिफ्टिंगसाठीचे व्यायाम करा, स्नायू मजबूत आणि लवचिक राहतात.
3. त्वचेची योग्य काळजी घ्या.
advertisement
चेहरा स्वच्छ ठेवा: दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ करा.
मॉइश्चरायझिंग: वयानुसार त्वचा कोरडी होते, म्हणून चांगलं मॉइश्चरायझर वापरा.
सनस्क्रीन: सूर्यकिरण त्वचेला हानी पोहोचवतात, म्हणून SPF 30+ सह सनस्क्रीन लावा.
advertisement
4. सकारात्मक विचार आणि तणावमुक्त जीवन
ध्यान: दररोज 10-15 मिनिटं ध्यान करा. त्यामुळे मन शांत आणि तणावमुक्त राहण्यासाठी मदत होते.
सकारात्मक विचार: आनंदी राहणं आणि प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक विचार केल्यानं शरीरावरील
वयाचा प्रभाव कमी होतो. कितीही तणाव असला तरी त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत राहा.
चांगली झोप : दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आणि त्वचेच्या दुरुस्तीसाठी ७-८ तासांची गाढ झोप आवश्यक
advertisement
आहे.
5. आत्मविश्वास जपण्यासाठी प्रयत्न करा.
स्मार्ट ड्रेसिंग: तुमच्या शरीरानुसार कपडे घाला. स्मार्ट आणि फिटिंग कपडे तुम्हाला अधिक
तरुण दिसतील.
केशरचना: व्यक्तिमत्वाला शोभेल अशी केशरचना करा. यामुळे तुम्हाला उत्साही वाटेल.
आत्मविश्वास: तुमचा आत्मविश्वास हे तुमच्या व्यक्तिमत्वाचं सर्वात मोठं सौंदर्य आहे.
स्वतःवर विश्वास ठेवा आणि नेहमी हसत राहा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 13, 2024 8:25 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Fitness Secrets : सकारात्मक विचार करा, स्वत:वर विश्वास ठेवा, व्यक्तिमत्वाची स्वतंत्र ओळख जपा


