1. निरोगी आणि संतुलित आहार
काय खावं: ताजी फळं, भाज्या, सुका मेवा. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वं
त्वचेचं तारुण्य राखतं.
काय खाऊ नये: प्रक्रिया केलेले अन्न - Processed food , जास्त साखर आणि तळलेलं
अन्न. यामुळे शरीर आतून कमकुवत होतं आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वाढतात.
हायड्रेशन: दिवसभरात किमान 8-10 ग्लास पाणी प्या. तुमची त्वचा हायड्रेटेड आणि चमकदार राहील.
advertisement
Weight loss drink : शरीरातील चरबी घटवण्यासाठी प्या हे ज्यूस, लिंबू, काकडी, कारल्याचा करा उपयोग
2. नियमित व्यायाम करा.
योगाभ्यास: व्यायाम करा.चेहऱ्याच्या स्नायूंना टोन करण्यासाठी फेस योगा करा.
कार्डिओ: तुमचं हृदय आणि फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी चाला, जॉगिंग किंवा नृत्य करा.
मसल टोनिंग: स्नायूंसाठी वेटलिफ्टिंगसाठीचे व्यायाम करा, स्नायू मजबूत आणि लवचिक राहतात.
3. त्वचेची योग्य काळजी घ्या.
चेहरा स्वच्छ ठेवा: दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ करा.
मॉइश्चरायझिंग: वयानुसार त्वचा कोरडी होते, म्हणून चांगलं मॉइश्चरायझर वापरा.
सनस्क्रीन: सूर्यकिरण त्वचेला हानी पोहोचवतात, म्हणून SPF 30+ सह सनस्क्रीन लावा.
Ayurvedic Oil : केस वाढवण्यासाठी करा आयुर्वेदिक तेलाचा वापर, केस होतील दाट आणि मुलायम
4. सकारात्मक विचार आणि तणावमुक्त जीवन
ध्यान: दररोज 10-15 मिनिटं ध्यान करा. त्यामुळे मन शांत आणि तणावमुक्त राहण्यासाठी मदत होते.
सकारात्मक विचार: आनंदी राहणं आणि प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक विचार केल्यानं शरीरावरील
वयाचा प्रभाव कमी होतो. कितीही तणाव असला तरी त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत राहा.
चांगली झोप : दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आणि त्वचेच्या दुरुस्तीसाठी ७-८ तासांची गाढ झोप आवश्यक
आहे.
5. आत्मविश्वास जपण्यासाठी प्रयत्न करा.
स्मार्ट ड्रेसिंग: तुमच्या शरीरानुसार कपडे घाला. स्मार्ट आणि फिटिंग कपडे तुम्हाला अधिक
तरुण दिसतील.
केशरचना: व्यक्तिमत्वाला शोभेल अशी केशरचना करा. यामुळे तुम्हाला उत्साही वाटेल.
आत्मविश्वास: तुमचा आत्मविश्वास हे तुमच्या व्यक्तिमत्वाचं सर्वात मोठं सौंदर्य आहे.
स्वतःवर विश्वास ठेवा आणि नेहमी हसत राहा.
