पलामू : पावसाळ्यात केस गळण्याची समस्या ही सामान्य बाब आहे. मात्र, यामुळे अनेक लोकांना टेन्शन येते. मात्र, तुम्ही काही घरगुती उपाय करुन केस गळण्याची ही समस्या कमी करू शकतात. त्यामुळे हे उपाय नेमके कोणते आहेत, हे जाणून घेऊयात.
पावसाळ्याच्या दिवसात कोंड्याची समस्या अधिक असते. यासोबतच खानपानमध्येही झालेल्या बदलामुळे केसगळती होते. त्यामुळे यावर उपाय म्हणून तुम्ही काही घरगुती उपाय करू शकतात. पलामू येथील ब्यूटी एक्सपर्ट अरुणा भासीन यांनी याबाबत माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, पावसाळ्याच्या दिवसात केस गळण्याचे प्रमाण वाढते. अनेक महिला केस गळत असल्याच्या तक्रारी करतात. अशा परिस्थितीत केसगळती कमी होऊ व्हावी म्हणून आम्ही त्यांना घरगुती उपाय करून पाहण्याच्या टिप्स सांगतो.
दही एक चांगला उपाय -
पुढे त्यांनी सांगितले की, केसांना दही लावल्यावर केस गळणे कमी होते. यासाठी एलोवेरा जेल दह्यात मिसळावे. यानंतर ते मिश्रण केसांना लावावे आणि अर्ध्या तासानंतर धुवावे. हा उपाय केल्यावर तुमचे केस मऊ आणि चमकदार झाले आहेत आणि केस गळणेही कमी झाले आहे, असे तुम्हाला दिसेल.
केसांवर जंतूंचा परिणाम काय -
ब्यूटी एक्सपर्ट अरुणा भासीन पुढे म्हणाल्या की, केसांमध्ये जंतू पडल्याने त्याचा केसांवर परिणाम होतो. यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुवावेत. कारण पावसाळ्याच्या दिवसात केस चिकट राहतात. म्हणून केस विंचरल्यावर केस गळतात. तसेच ओल्या केसांना कधीच विंचरू नये, ही बाब कायम लक्षात ठेवावी. यामुळे केस गळतात.
यानंतर मुलतानी मातीत गुलाबपाणी आणि उधूळ फुले एकत्र करून मिश्रण तयार करा. केसांना लावा आणि १५ मिनिटांनी धुवा. यामुळे केसगळती कमी होते. मुलतानी मातीत गुलाबपाणी आणि उधूळ फुले एकत्र करून मिश्रण तयार करा. केसांना लावा आणि १५ मिनिटांनी धुवा. यामुळे केसगळती कमी होते.
तसेच मुलतानी मातीत गुलाबपाणी आणि जास्वंदाची फुले एकत्र करून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण केसांना लावावे आणि 15 मिनिटांनी केस धुवावे. यामुळेही केसगळती कमी होते, असे त्या म्हणाले.
सूचना - ही माहिती ब्यूटी एक्सपर्ट यांच्याशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.