TRENDING:

Watermelon: रंगाला भुलू नका! नैसर्गिक पिकलेलं कलिंगड ओळखायचं कसं? सोप्या टिप्स

Last Updated:

Watermelon: उन्ह तापलेलं असताना लालभडक कलिंगड खायला कुणालाही आवडतं. पण या चकचकीत लाल रंगाच्या जाळ्यात अडकण्याआधी योग्य तपासणी करणे आवश्यक आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नमिता सूर्यवंशी, प्रतिनिधी
advertisement

मुंबई : उन्हाळ्यात गारवा देणारे कलिंगड पाहून तोंडाला पाणी सुटते. हिरव्या सालीआड लालसर, रसाळ गर पाहताच खरेदीसाठी हात पुढे जातात. पण हा रंग नैसर्गिक आहे की कृत्रिम? सध्याच्या बाजारात काही व्यापारी कलिंगड अधिक आकर्षक दिसण्यासाठी कृत्रिम रंग व रसायनांचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. आहारतज्ज्ञ अमृता उत्तरावर बोनगीरवर यांनी लोकल18 च्या माध्यमातून रसायनयुक्त कलिंगड कसं ओळखायचं? याबद्दल काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत.

advertisement

उन्ह तापलेलं असताना लालभडक कलिंगड खायला कुणालाही आवडतं. पण या चकचकीत लाल रंगाच्या जाळ्यात अडकण्याआधी योग्य तपासणी करणे आवश्यक आहे. मायन किंवा इतर घातक रसायनांच्या सहाय्याने कलिंगडाचा रंग वाढवला जातो. काही वेळा इंजेक्शनद्वारे कलिंगडांना कृत्रिम रंग दिला जातो, त्यामुळे नैसर्गिक गोडव्याचा नाश होतो आणि अन्नविषबाधा, पचनसंस्थेच्या तक्रारींसह गंभीर आरोग्यविषयक धोके वाढतात, असं आहारतज्ज्ञ सांगतात.

advertisement

वडापावमधून पाव गायब होणार! नव्या नियमाचा फटका, नेमंक कारण काय?

नैसर्गिक तयार कलिंगड कसे ओळखावे?

1) फळाचा तळभाग तपासा: जमिनीला टेकलेला भाग नैसर्गिकरित्या किंचित पिवळसर असतो. संपूर्ण कलिंगड एकसंध रंगाचे असल्यास, ते कृत्रिमरित्या पिकवलेले असण्याची शक्यता असते.

2) पाण्यात टाका: कलिंगडाचा लहानसा तुकडा पाण्यात टाका. जर पाणी गुलाबीर झालं, तर कलिंगडाला कृत्रिम रंग लावलेला असतो.

advertisement

3) नैसर्गिक कलिंगडाच्या बिया तपकिरी आणि कळ्या रंगाच्या असतात. तसंच कलिंगड आतून लालसर असतेच पण ते कृत्रिम वाटत नाही.

4) कृत्रिम कलिंगडच्या बिया ह्या पांढऱ्या रंगाच्या असतात व आतून गडद लालसर दिसते. काही वेळा रंग हाताला लागण्याची शक्यता असते.

बाजारभाव आणि आवक

वाशी फळ बाजारात कलिंगडाचे दर 1 हजार ते दीड हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत. आवक वाढल्यास दरात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी आकर्षक रंगावर न भुलता योग्य तपासणी करूनच कलिंगड घ्यावे.

advertisement

लाल रंगला भुलू नका..!

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

लालसर, रसाळ कलिंगड मोहक दिसले तरीही, त्यामागील संभाव्य धोके ओळखणे गरजेचे आहे. सुरक्षित आणि नैसर्गिक फळांची निवड करा. आरोग्यास प्राधान्य द्या, असंही आहारतज्ज्ञ अमृता उत्तरावर बोनगीरवर सांगतात.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Watermelon: रंगाला भुलू नका! नैसर्गिक पिकलेलं कलिंगड ओळखायचं कसं? सोप्या टिप्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल