पावसाळ्यामध्ये आपल्या सर्वांना चमचमीत आणि तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण, आहार तज्ज्ञांच्या मते, आपण तळलेले पदार्थ खाणे टाळलं पाहिजे. पावसाळ्यात वातावरणात असलेल्या आर्द्रतेमुळे पोट दुखी होऊ शकते. काहीवेळा जुलाब-उलट्यांचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यात आपण साधा आणि सात्विक आहार घेणे गरजेचं आहे.
पावसाळ्यात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सूप, मूग, मटकी, चवळी अशी कडधान्ये, ज्वारीची भाकरी, हातसडीचा तांदूळ, नाचणीचे पदार्थ यांचा तुमच्या आहारात समावेश करू शकता. तुम्ही सिझनल फळं देखील खाऊ शकता.
advertisement
पावसाळ्यामध्ये अनेकांना नॉनव्हेज खाण्याबाबत प्रश्न पडतो. याबाबत बोलताना आहार तज्ज्ञ म्हणाल्या की, पावसाळ्यात आहारामध्ये नॉनव्हेजचा समावेश करण्यास हरकत नाही पण, त्याचे प्रमाण फारच कमी असावे. नॉनव्हेज पचण्यासाठी जड असते. पावसाळ्यात आपली पचनशक्ती फारशी चांगली नसते. पोटदुखी सारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर नॉनव्हेज खाण्याची इच्छा असेल तर सकाळच्या वेळेतच खावे. रात्रीच्या जेवणात नॉनव्हेज खाणे टाळावे.