फरीदाबाद - हिवाळा सुरू झाला असून आता थंडीही जाणवायला लागली आहे. अशावेळी हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे असते. म्हणून हिवाळ्यात नेमकी आरोग्याची कशी घ्यावी, याचबाबत आपण महत्त्वाच्या 10 टिप्स जाणून घेणार आहोत.
ब्लँकेट उन्हात टाका -
हिवाळ्यात ब्लँकेटला उन्हात ठेवावे. अन्यथा बॅक्टेरिया आणि किडे पडण्याची शक्यता असते. तसेच सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने ते स्वच्छ होतात. तसेच त्यांचा विचित्र वासही निघून जातो.
advertisement
स्वटेर, जॅकेट धुवून घ्यावे -
स्वेटर, जॅकेट, असे उबदार कपडे धुवावे आणि वाळवून घ्यावे. यामुळे ओलसर वास आणि त्वचेचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. तसेच कपडे मऊ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी सौम्य डिटर्जंट वापरावे.
मुलांसाठी कपड्यांची खरेदी करा -
मुलांचे कपडे लवकरच त्यांना लहान होऊ लागतात. मागच्या वर्षाचे कपडे तपासून गरजेनुसार नवीन कपडे खरेदी करावेत. मोजेही तपासून घ्यावेत.
गिझरची सर्व्हिसिंग करा -
हिवाळ्यात गरम पाणी लागते. त्यामुळे गिझरची सर्व्हिसिंग करणे आणि योग्य काम करत आहे की नाही, हे तपासून घेणे. गिझर खराब झाले असेल तर त्याला रिपेअर करावे किंवा बदलून घ्यावे.
घर स्वच्छ करावे -
हिवाळ्यात घरातील आर्द्रता वाढते. यामुळे धूळ आणि बॅक्टेरियाचा धोका वाढू शकतो. म्हणून संपूर्ण घराची नीट साफसफाई करावी. यामध्ये विशेष करुन स्वयंपाकघर, फ्रीझर आणि ओव्हन स्वच्छ करण्याकडे लक्ष द्यावे.
डीह्यूमिडिफायर लावून घ्यावे -
हिवाळ्यात घरातील आर्द्रता वाढल्याने भिंती आणि फर्निचरवर ओलसरपणा येऊ शकतो. अशा परिस्थितीत डिह्युमिडिफायर हवेतील आर्द्रता कमी करते आणि घराला ओलसरपणापासून वाचवते.
पाळीव प्राण्यांसाठी उष्ण कपडे -
तुमच्याकडे पाळीव प्राणी असल्यास हिवाळ्यात त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी त्यांना लोकरीचे कपडे आणि योग्य आहार द्यावा. यामुळे कडाक्याच्या थंडीतही त्यांचे आरोग्य चांगले राहील.
तरुणीने दिले लग्नाला होकार, गोड बोलून पैसेही मागू लागली, शेवटी तरुणासोबत घडलं मोठं कांड
गरम अन्न आणि पेये काळजी घ्या -
हिवाळ्यात आपल्या आहारात उबदार गोष्टींचा समावेश करा. सूप, हळदीचे दूध आणि ताजी फळे आणि पाने शरीराला आतून उबदार आणि निरोगी ठेवतात.
घराचे दरवाजे आणि खिडक्या तपासा -
हिवाळ्यात घरातील थंड हवा बाहेर ठेवण्यासाठी खिडक्या आणि दरवाजे तपासा. थंड हवा आत येऊ नये, यासाठी योग्य ती पूर्ण काळजी घ्यावी.
हीटर आणि इतर उपकरणे -
हिवाळ्यात हिटर किंवा इतर उपकरणांचा वापर वाढतो. त्यामुळे ते व्यवस्थित काम करत आहे की नाही, हे तपासून घ्यावे.
अशाप्रकारे या सर्व उपायांचा अवलंब करून तुम्ही हिवाळ्यात तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.
सूचना - ही माहिती आरोग्यतज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट फॉलो करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
