TRENDING:

Winter Care : हिवाळ्याचा आनंद घ्या पण या सवयी टाळा, शरीरासाठी आहेत धोकादायक

Last Updated:

हिवाळ्यात आपल्या दिनचर्येचा आणि खाण्याच्या सवयींचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. थंडीमुळे आपण अनेकदा अशा सवयी लावतो ज्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतात. या चुका आपण जाणूनबुजून किंवा नकळत करत असतो, परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं तर आपलं आरोग्य बिघडू शकतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सध्या सगळीकडे थंडी आहे. हिवाळ्यात थंडीचा आनंद घेताना आपल्या आरोग्याची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. खाण्याच्या योग्य आणि आरोग्यदायी सवयींमुळे तुम्ही या ऋतूचा पुरेपूर आनंद घेऊ शकता आणि आजारांपासून दूर राहू शकता. पण हिवाळ्यात खाण्यापिण्याच्या चुकीच्या 5 सवयी तुम्हाला आजारी पाडू शकतात, त्या कोणत्या ते पाहूयात.
News18
News18
advertisement

हिवाळा ऋतू म्हणजे थंडी आणि कोरडी हवा. या ऋतूत आपल्या दिनचर्येचा आणि खाण्याच्या सवयींचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आपण अनेकदा अशा सवयी लावतो ज्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतात. या चुका आपण जाणूनबुजून किंवा नकळत करत असतो, परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं तर आपलं आरोग्य बिघडू शकतं.

- तळलेले पदार्थ आणि जंक फूडचं जास्त सेवन टाळा.

advertisement

हिवाळ्यात लोक गरम तळलेले पदार्थ, समोसे, भजी आणि जंक फूड जास्त खातात. या पदार्थांमुळे शरीरातील कोलेस्टेरॉल वाढतं आणि पचनसंस्था कमकुवत होऊ शकते. हिवाळ्यात पचनक्रिया मंदावते, त्यामुळे अशा अन्नाच्या सेवनानं लठ्ठपणा, अपचन आणि गॅसची समस्या वाढू शकते. तळलेल्या पदार्थांऐवजी पौष्टिक आणि घरगुती पदार्थांना प्राधान्य द्या.

Spices for blood sugar control : स्वयंपाकघरात या मसाल्यांचा वापर करा, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवा

advertisement

2. पुरेसं पाणी प्या.

थंडीच्या वातावरणात तहान कमी लागते, पण याचा अर्थ शरीराला पाण्याची गरज नाही असं नाही. हिवाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन, बद्धकोष्ठता आणि त्वचा कोरडी होऊ शकते. दिवसभर नियमितपणे कोमट पाणी प्या. हर्बल टी किंवा सूप हे देखील चांगले पर्याय आहेत, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.

3. ताज्या भाज्या आणि फळं खा

advertisement

ताज्या भाज्या आणि हंगामी फळं हिवाळ्यात सहज उपलब्ध असतात, पण लोक सहसा याकडे दुर्लक्ष करतात आणि अधिक प्रक्रिया केलेलं आणि पॅकेज्ड फूड खातात. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक द्रव्यं मिळत नाहीत. पालक, मेथी, गाजर, मुळा यांसारख्या भाज्या आणि मोसंबी, पेरू आणि डाळिंब यांसारख्या हंगामी फळांचा आहारात समावेश करा.

Magnesium : हिवाळ्यात आहाराकडे द्या विशेष लक्ष, मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा करा समावेश

advertisement

4. जास्त साखर खाणं टाळा.

गाजर हलवा आणि इतर मिठाईची क्रेझ हिवाळ्यात वाढते. पण जास्त गोड खाल्ल्यानं रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि लठ्ठपणाचाही धोका असतो. मिठाईचं सेवन मर्यादित प्रमाणात करा. मध, गूळ किंवा नैसर्गिक गोड पर्यायांचा विचार करा.

5. शारीरिक हालचालींचा अभाव

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

हिवाळ्यात थंडीमुळे झोपेतून उठावंसं वाटत नाही. त्यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात. यामुळे चयापचय क्रिया मंद होऊ शकते आणि वजन वाढू शकतं. त्यामुळे रोज हलका व्यायाम, योगा किंवा मॉर्निंग वॉक करा. यामुळे शरीर सक्रिय राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Winter Care : हिवाळ्याचा आनंद घ्या पण या सवयी टाळा, शरीरासाठी आहेत धोकादायक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल