Magnesium : हिवाळ्यात आहाराकडे द्या विशेष लक्ष, मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा करा समावेश

Last Updated:

हिवाळ्यात तुमच्या आहारात मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा समावेश नक्की करा. यामुळे थंडीचे दुष्परिणाम टाळता येतीलच शिवाय मॅग्नेशियममुळे तुमचं शरीर आतून मजबूत होतं, त्यामुळे आरोग्यही चांगलं राहतं.

News18
News18
मुंबई : हिवाळ्यात थंडीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या जाणवतात. या काळात शरीराला निरोगी ठेवण्यासाठी योग्य पोषण खूप महत्वाचं आहे. मॅग्नेशियमसारख्या खनिजांची गरज या ऋतूमध्ये जास्त जाणवते. यामागचं कारण समजून घेऊयात. मॅग्नेशियममुळे थंडीच्या दुष्परिणामांपासून शरीराला संरक्षण मिळतं.
मॅग्नेशियम शरीरातील चयापचय आणि स्नायू आणि हाडं मजबूत ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. जाणून घेऊया हिवाळ्यात मॅग्नेशियमयुक्त पदार्थ खाण्याचे फायदे आणि कोणत्या पदार्थांमध्ये हे खनिज मुबलक प्रमाणात आढळतं त्याबद्दलची माहिती..
- स्नायू आणि हाडांची ताकद राखली जाते
advertisement
हिवाळ्यात थंडीमुळे सांधे आणि स्नायू दुखण्याची समस्या वाढते. मॅग्नेशियममुळे हाडं मजबूत होतात आणि स्नायूंना आराम करण्यास मदत करते.
- शरीराला ऊर्जा मिळते.
हिवाळ्यात अनेकांना आळस आणि खूप थकवा जाणवतो. मॅग्नेशियमच शरीराला आवश्यक ऊर्जा उत्पादनात मदत करते आणि थकवा दूर करते.
- हृदयाच्या आरोग्याची काळजी
हिवाळ्यात रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो. मॅग्नेशियममुळे योग्य रक्त प्रवाह राखण्यात आणि हृदयाचं आरोग्य सुधारण्यात मदत होते.
advertisement
- तणाव आणि चिंता कमी करणे
हिवाळ्यात दिवस कमी असल्यानं अनेकांना उदास वाटतं. काहींना तणाव जाणवतो. मॅग्नेशियममुळे तणाव कमी करण्यासाठी आणि मूड सुधारण्यासाठी मदत होते.
मॅग्नेशियमयुक्त अन्न घटक -
बदाम आणि काजू:
सुक्या मेव्यातले हे दोन घटक मॅग्नेशियमचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. त्यामुळे याचा आहारात नक्की समावेश करा.
पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्या : हिवाळ्यात पालक, मेथी सारख्या हिरव्या भाज्या खाल्ल्यानं शरीराला मॅग्नेशियम तर मिळतंच पण इतर पोषक घटकही मिळतात.
advertisement
सीड्स - बिया : बियांमध्ये मॅग्नेशियम आणि इतर खनिजं मुबलक प्रमाणात असतात. याचा वापर सॅलड्स किंवा
पदार्थांमध्ये केला जाऊ शकतो.
ओट्स : ओट्समुळे हिवाळ्यात ऊर्जा मिळते, तसंच शरीराला मॅग्नेशियमचा पुरवठा होतो.
डार्क चॉकलेट: डार्क चॉकलेट स्वादिष्ट असतच तसंच त्यात भरपूर मॅग्नेशियम देखील असतं.
advertisement
केळी: केळी हे एक स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारं फळ आहे, केळी हा मॅग्नेशियम आणि पोटॅशियम या दोन्हीचा उत्कृष्ट स्रोत आहे.
अक्रोड आणि चिया सीड्स : हे पदार्थ हिवाळ्यात शरीराला उबदारपणा आणि पोषण देतात.
मॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणं
स्नायूंमध्ये पेटके येणं
थकवा आणि अशक्तपणा जाणवणं
निद्रानाश
हृदयाचा ठोका अनियमित होणं
मॅग्नेशियम पूरक आहारासाठी टिप्स
advertisement
नाश्त्यासाठी ओट्समध्ये सीड्स आणि सुकामेवा घालू शकता.
पालेभाज्यांमध्ये पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्यांचा वापर वाढवा.
चहा किंवा कॉफीसोबत डार्क चॉकलेटचा आनंद घ्या.
सूप आणि सॅलडमध्ये चिया सीडस् आणि सूर्यफूलाच्या बिया घाला.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Magnesium : हिवाळ्यात आहाराकडे द्या विशेष लक्ष, मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा करा समावेश
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement