Dates : हिवाळ्यात खा खजूर, प्रतिकारशक्ती होईल मजबूत, आजारांपासून होईल रक्षण
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
खजुरामुळे तुमचं शरीर आतून उबदार राहतं आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामुळे बाहेरचा संसर्ग किंवा वेगवेगळ्या आजारांपासून रक्षण होतं. खजूर चवीला गोड असतातच यातून शरीराला ऊर्जा मिळते.
मुंबई : हिवाळ्याच्या मोसमात, सुका मेवा खाल्ला जातो. सुका मेवा म्हणजे तब्येतीसाठी उपयुक्त, आहारामध्ये सुका मेवा असतोच. त्यातलाच एक म्हणजे खजूर..खजुरामुळे तुमचं शरीर आतून उबदार राहतं आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामुळे बाहेरचा संसर्ग किंवा वेगवेगळ्या आजारांपासून रक्षण होतं. खजूर चवीला गोड असतात, यातून शरीराला ऊर्जा मिळत राहते.
हाडं मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त
थंड वातावरणात शरीराला अधिक ऊर्जेची गरज असते, अशा स्थितीत खजुरामुळे ही गरज पूर्ण करता येते. हिवाळ्यात जेव्हा हाडं जास्त दुखतात तेव्हा खजूर खाणं फायदेशीर ठरतं कारण त्यात कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक असतात.
advertisement
पचन निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त
हिवाळ्यात अनेकांना पचनाच्या समस्यांचा जाणवतात. खजुरामध्ये असलेलं फायबर पचनक्रिया निरोगी ठेवण्यास मदत करतं. त्याच वेळी, खजुरामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण चांगलं असतं, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासांठी उपयुक्त
advertisement
खजुरामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. खजुरात व्हिटॅमिन बी 5 आणि व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होते. केसांच्या वाढीस देखील यामुळे प्रोत्साहन मिळतं.
नैराश्य कमी करण्यासाठी उपयोगी
खजुरामध्ये व्हिटॅमिन बी 6 असतं, ज्यामुळे मानसिक शांती मिळते. विशेषतः हिवाळ्यात जेव्हा थकवा आणि नैराश्य जास्त जाणवतं, तेव्हा याचा उपयोग होऊ शकतो. खजुरात जास्त प्रमाणात फायबर असत, ज्यामुळे पोट जास्त काळ भरलेलं राहतं आणि त्यामुळे वजन वाढण्याची भीती नसते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 20, 2024 3:04 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Dates : हिवाळ्यात खा खजूर, प्रतिकारशक्ती होईल मजबूत, आजारांपासून होईल रक्षण


