Winter Care : घरी तयार करा विंटर केअर क्रिम, हिवाळ्यात कोरड्या त्वचेवर घरीच आहे उपाय
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
हिवाळ्याच्या दिवसात त्वचा खूप कोरडी आणि निर्जीव होत असेल तर घरच्या घरी तुम्ही क्रिम बनवू शकता. या क्रिममुळे, तुमच्या चेहऱ्यावरची आर्द्रता टिकून राहील आणि घरी तयार केलेलं असल्यामुळे त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
मुंबई : हिवाळ्याच्या दिवसात त्वचा खूप कोरडी आणि निर्जीव होत असेल तर घरच्या घरी तुम्ही क्रिम बनवू शकता. या क्रिममुळे, तुमच्या चेहऱ्यावरची आर्द्रता टिकून राहील आणि घरी तयार केलेलं असल्यामुळे त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव वाटते. कारण या काळात थंड वारे आणि थंड हवामान त्वचेतील ओलावा काढून घेतात. यासाठी कोणतीही महागडी क्रिम विकत घेण्याआधी एक उपाय नक्की करुन पाहा. तो म्हणजे, हिवाळ्यात, त्वचा मुलायम आणि मऊ ठेवण्यासाठी घरी मॉइश्चरायझर बनवता येईल. ज्यासाठी आवश्यक सर्व साहित्य सहज उपलब्ध आहे.
advertisement
होममेड क्रीमसाठी, त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी 2 चमचे खोबरेल तेल, 1 चमचा मध आणि 1 चमचा तूप आणि 1 चमचा गुलाबजल, 2 ते 3 थेंब व्हिटॅमिन ई आणि 1 चमचा कोरफड गर आवश्यक आहे. हे क्रिम तयार करण्यासाठी एका स्वच्छ भांड्यात खोबरेल तेल, तूप आणि मध घाला. आता या तीन गोष्टी नीट मिसळा. त्यात गुलाब पाणी आणि कोरफडीचा गर मिसळा, शेवट व्हिटॅमिन ई चं तेल घाला आणि चांगलं मिक्स करा. होममेड क्रीम तयार आहे.
advertisement
हे क्रीम त्वचेवर दिवसातून दोन ते तीन वेळा लावा. आंघोळीनंतर क्रिम जरुर लावा. कारण काहीवेळा, आंघोळीनंतर, चेहरा कोरडा होतो. हे क्रिम लावल्यानं चेहऱ्यावरची सूज आणि खाज कमी होते. हे क्रीम हिवाळ्यात तुमची त्वचा मऊ, आणि निरोगी ठेवण्यास मदत करेल. याशिवाय तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी आणि ई असलेल्या पदार्थांचं प्रमाण जास्त ठेवा. कारण त्वचेला बाहेरुन कितीही क्रिम, तेल लावलं तरी तुमचा आहार कसा आहे यावर तुमच्या त्वचेची गुणवत्ता अवलंबून असते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2024 8:55 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Winter Care : घरी तयार करा विंटर केअर क्रिम, हिवाळ्यात कोरड्या त्वचेवर घरीच आहे उपाय











