Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत चढला पारा, ठाण्यात घामाच्या धारा, 24 तासांसाठी हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert in Marathi: महाराष्ट्रातील थंडीची तीव्रता कमी झाली असून हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कल्याण-डोंबिवलीसह ठाणे परिसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
advertisement
कल्याण-डोंबिवलीत हवामान प्रामुख्याने कोरडे, स्वच्छ आणि उबदार राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारी किमान व कमाल तापमान किंचित वाढ होण्याची शक्यता असून ,कमाल तापमान 35-36 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. उन्हाचा तडाखा जाणवेल. पहाटे आणि रात्री हलकी थंडी असू शकते, पण दुपार उष्णता हैराण करेल.
advertisement
advertisement
बदलापूरमधील तापमान गुरुवार पासून पुन्हा स्थिर होऊन अंशतः ढगाळ आणि उष्ण असेल. कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहील. शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील हवामान उष्ण व कोरडे राहील. कमाल तापमान 33-35अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19-21 अंश सेल्सिअस असेल. तापमानात मोठी वाढ झाल्याने नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.







