advertisement

Vijaya Ekadashi 2026: चौफेर वाजेल डंका! विजया एकादशीचे धार्मिक महत्त्व, पूजा मुहूर्त, विधी-मंत्र पाहा

Last Updated:

Vijaya Ekadashi 2026: पद्म पुराणानुसार, या दिवशी विधीवत भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. या व्रताचे पुण्य वाजपेय यज्ञाच्या बरोबरीचे असून व्यक्तीला जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते.

News18
News18
मुंबई : आज विजया एकादशी असून मराठी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील ही तिथी विजयासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सनातन परंपरेत एकादशी व्रताला विशेष स्थान आहे, परंतु विजया एकादशी ही नावच सुचवते त्याप्रमाणे विजय, यश आणि संकटांचे निवारण करणारी मानली जाते. पद्म पुराणानुसार, या दिवशी विधीवत भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. या व्रताचे पुण्य वाजपेय यज्ञाच्या बरोबरीचे असून व्यक्तीला जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते.
विजया एकादशीचे धार्मिक महत्त्व -
पौराणिक कथांनुसार, त्रेतायुगात जेव्हा प्रभू श्रीराम माता सीतेच्या शोधात समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले, तेव्हा समुद्र पार करण्याची चिंता त्यांना वाटू लागली होती. त्यावेळी महर्षी बकदाल्भ्य यांनी श्रीरामांना विजया एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. श्रीरामांनी हे व्रत पूर्ण श्रद्धेने केल्यामुळे त्यांना समुद्र पार करण्यात यश आले आणि लंकापती रावणावर विजय मिळवता आला. तेव्हापासून या एकादशीला विजय मिळवून देणारी एकादशी म्हटले जाते. या व्रतामुळे शत्रूंवर विजय, न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश आणि जीवनातील सर्व कठीण प्रसंगांतून मार्ग निघतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
विजया एकादशी 2026 तिथी आणि वेळ -
यावर्षी तिथींच्या वेळेनुसार विजया एकादशी आज साजरी केली जात आहे:
एकादशी तिथीचा प्रारंभ: 12 फेब्रुवारी, दुपारी 12 वाजून 22 मिनिटांनी
एकादशी तिथीची समाप्ती: 13 फेब्रुवारी, दुपारी 2 वाजून 25 मिनिटांपर्यंत
उदयतिथीनुसार विजया एकादशीचे व्रत 13 फेब्रुवारी म्हणजे आजच करावे.
व्रत सोडण्याची वेळ (पारण): 14 फेब्रुवारी, सकाळी 7 वाजल्यापासून ते 9 वाजून 14 मिनिटांच्या दरम्यान.
advertisement
विजया एकादशी शुभ मुहूर्त 2026
ब्रह्म मुहूर्त: सकाळी 5:17 ते सकाळी 6:08 पर्यंत
अभिजित मुहूर्त: दुपारी 12:13 ते दुपारी 12:58 पर्यंत
विजय मुहूर्त: दुपारी 2:27 ते दुपारी 3:12 पर्यंत
advertisement
विजया एकादशी पूजा विधी -
आज सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत आणि देवघर गंगाजलाने पवित्र करावे. भगवान विष्णूच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला पिवळ्या फुलांचा हार अर्पण करावा. विष्णू पूजेत तुळशीला अत्यंत महत्त्व असल्याने फळे, मिठाई आणि वस्त्रांसोबत तुळशीची पाने आवर्जून अर्पण करावीत. यानंतर विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू चालीसा पठण करावे आणि विजया एकादशीची व्रत कथा श्रवण करावी. शेवटी धूप-दीप लावून आरती करावी. हे व्रत करणारे भाविक दिवसभर निराहार राहतात आणि रात्री देवाचे नामस्मरण करत जागरण करतात.
advertisement
विष्णू मंत्र -
ॐ नमो भगवते वासुदेवाय।
ॐ विष्णवे नमः।
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं।
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम्॥
श्री हरी विष्णूची आरती -
ॐ जय जगदीश हरे, स्वामी! जय जगदीश हरे।
advertisement
भक्तजनों के संकट क्षण में दूर करे॥
जो ध्यावै फल पावै, दुख बिनसे मन का।
सुख-संपत्ति घर आवै, कष्ट मिटे तन का॥
ॐ जय जगदीश हरे, स्वामी! जय जगदीश हरे॥
मात-पिता तुम मेरे, शरण गहूं किसकी।
तुम बिन और न दूजा, आस करूं जिसकी॥
ॐ जय जगदीश हरे, स्वामी! जय जगदीश हरे॥
advertisement
तुम पूरन परमात्मा, तुम अंतरयामी॥
पारब्रह्म परेमश्वर, तुम सबके स्वामी॥
ॐ जय जगदीश हरे, स्वामी! जय जगदीश हरे॥
तुम करुणा के सागर तुम पालनकर्ता।
मैं मूरख खल कामी, कृपा करो भर्ता॥
ॐ जय जगदीश हरे, स्वामी! जय जगदीश हरे॥
तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति।
किस विधि मिलूं दयामय! तुमको मैं कुमति॥
ॐ जय जगदीश हरे, स्वामी! जय जगदीश हरे॥
दीनबंधु दुखहर्ता, तुम ठाकुर मेरे।
अपने हाथ उठाओ, द्वार पड़ा तेरे॥
ॐ जय जगदीश हरे, स्वामी! जय जगदीश हरे॥
विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा।
श्रद्धा-भक्ति बढ़ाओ, संतन की सेवा॥
ॐ जय जगदीश हरे, स्वामी! जय जगदीश हरे॥
विष्णुजी की आरती जो कोई नर गावे।
कहत शिवानंद स्वामी, मनवांछित फल पावे॥
ॐ जय जगदीश हरे, स्वामी! जय जगदीश हरे॥
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vijaya Ekadashi 2026: चौफेर वाजेल डंका! विजया एकादशीचे धार्मिक महत्त्व, पूजा मुहूर्त, विधी-मंत्र पाहा
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement