Mahashivaratri 2026: नंदीच्या उजव्या कानातच का सांगतात मनोकामना? शंभूदेवापर्यंत इच्छा पोहचण्याचे रहस्य
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mahashivaratri 2026: महाशिवरात्रीला शिवभक्त मनोभावे महादेवाची पूजा करतात. शिव मंदिरातील नंदी महाराज हे केवळ महादेवाचं वाहन नसून ते त्यांचे सर्वात मोठे भक्त आणि द्वारपाल आहेत. मंदिरात नंदी महाराजांचं तोंड नेहमी शिवलिंगाकडे असतं, ज्याचा अर्थ त्यांचा पूर्ण ध्यास महादेवाकडे असतो. म्हणूनच..
मुंबई : सालाबाद प्रमाणे सर्वत्र महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी महाशिवरात्री 15 फेब्रुवारी, रविवार रोजी आहे. ही रात्र शिवभक्तांसाठी खूप मोठी असते. महाशिवरात्रीला शिवभक्त मनोभावे महादेवाची पूजा करतात. शिव मंदिरातील नंदी महाराज हे केवळ महादेवाचं वाहन नसून ते त्यांचे सर्वात मोठे भक्त आणि द्वारपाल आहेत. मंदिरात नंदी महाराजांचं तोंड नेहमी शिवलिंगाकडे असतं, ज्याचा अर्थ त्यांचा पूर्ण ध्यास महादेवाकडे असतो. म्हणूनच आपली इच्छा देवापर्यंत पोहोचवण्यासाठी नंदीला सर्वात विश्वासू माध्यम मानले जाते.
कानात इच्छा का सांगितली जाते?
नंदी महाराजांच्या कानात हळूच आपली इच्छा सांगण्यामागे काही महत्त्वाची कारणं सांगितली जातात. पहिली गोष्ट म्हणजे, हळूच बोलणं हे गोपनीयतेचं प्रतीक आहे, म्हणजेच भक्त आपली खरी आणि खाजगी इच्छा कोणत्याही दिखाव्याशिवाय देवापर्यंत पोहोचवत असतो. दुसरं असं की, नंदींचं लक्ष नेहमी महादेवाकडे असतं, त्यामुळे आपण त्यांच्याकडे जे काही बोलतो, ते थेट देवापर्यंत पोहोचतं अशी श्रद्धा आहे. अनेकांना असा अनुभव येतो की नंदीच्या कानात सांगितलेली आपली अडलेली कामं, जसे की नोकरी किंवा घरगुती समस्या, नंतर सुटायला मदत होते.
advertisement
उजव्या कानातच का?
धार्मिक मान्यतेनुसार उजवी बाजू ही नेहमी शुभ, सकारात्मक आणि ऊर्जेने भरलेली मानली जाते. आपण पूजेचे कोणतेही काम करताना उजव्या हाताचा वापर करतो, त्याचप्रमाणे नंदींचा उजवा कान हा शुभ मानला गेला आहे. उजव्या कानात सांगितलेली इच्छा सात्विक भावनेतून येते आणि ती लवकर फळदायी ठरते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
इच्छा सांगताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
नंदीच्या कानात आपली इच्छा सांगण्यापूर्वी आधी शिवलिंगाचं दर्शन घ्यावं. त्यानंतर नंदींना लांबूनच प्रणाम करावा, त्यांना स्पर्श करण्याची गरज नसते. 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा जप करून त्यांना बेलपत्र किंवा फूल अर्पण करावं. त्यानंतर शांत मनाने त्यांच्या उजव्या कानात आपली इच्छा सांगावी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल, तेव्हा मंदिरात जाऊन आभार मानायला विसरू नका, कारण तोच खरा भक्तीभाव आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याचा आम्ही दावा करत नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 4:32 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Mahashivaratri 2026: नंदीच्या उजव्या कानातच का सांगतात मनोकामना? शंभूदेवापर्यंत इच्छा पोहचण्याचे रहस्य






