Mahashivratri Vrat 2026: आधी संकल्प मग उपवासाची सुरुवात! यंदाच्या महाशिवरात्रीला या पद्धतीनं करा शिव-आराधना
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mahashivratri Vrat 2026: काशीच्या ज्योतिष्यांच्या मते, तब्बल 300 वर्षांनंतर या महाशिवरात्रीला 8 शुभ योगांचा संयोग जुळून येत आहे. 15 फेब्रुवारीला सूर्य, बुध आणि शुक्र या ग्रहांचा त्रिग्रही योग असेल. सोबतच महादेवांना आवडणारा श्रवण नक्षत्रही आहे. याशिवाय व्यतिपात, वरियान..
मुंबई : महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील खूप मोठा सण आहे. शिवभक्त हा दिवस मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. असं मानलं जातं की, याच दिवशी भगवान शिव पहिल्यांदा निराकार स्वरूपातून साकार रूपात प्रकट झाले होते. तसंच, शिव आणि शक्तीचं म्हणजेच महादेवाचं आणि माता पार्वतीचं लग्न याच रात्री झालं होतं. पुराणांनुसार, याच रात्री महादेवांनी तांडव नृत्य केलं होतं. या रात्री जागरण आणि भजन-कीर्तनाला खूप महत्त्व असतं, यामुळे मनाला शांती आणि ताकद मिळते.
300 वर्षांनंतरचा खास योगायोग - काशीच्या ज्योतिष्यांच्या मते, तब्बल 300 वर्षांनंतर या महाशिवरात्रीला 8 शुभ योगांचा संयोग जुळून येत आहे. 15 फेब्रुवारीला सूर्य, बुध आणि शुक्र या ग्रहांचा त्रिग्रही योग असेल. सोबतच महादेवांना आवडणारा श्रवण नक्षत्रही आहे. याशिवाय व्यतिपात, वरियान, ध्रुव आणि राज योग सुद्धा आहेत, ज्यामुळे हा दिवस अधिकच खास झाला आहे.
advertisement
पंचांगानुसार, चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारी 2026 ला संध्याकाळी 5 वाजून 4 मिनिटांनी सुरू होईल आणि 16 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजून 34 मिनिटांनी संपेल. त्यामुळे मुख्य महाशिवरात्री 15 फेब्रुवारीलाच साजरी केली जाईल. उपवास सोडण्याची म्हणजेच पारणाची वेळ 16 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजून 33 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 10 मिनिटांपर्यंत असेल.
advertisement
व्रताचा संकल्प करणं म्हणजे देवासमोर आपली इच्छा बोलून दाखवणं होय. यासाठी सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून देव्हाऱ्यासमोर बसावे. उजव्या हाताच्या तळव्यावर थोडे पाणी, अक्षता, फूल आणि एखादे नाणे घ्यावे. त्यानंतर डोळे मिटून देवाचे ध्यान करत आपले नाव आणि आजचा दिवस म्हणजेच महाशिवरात्रीचा उल्लेख करावा. आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती देवाला सांगावी आणि आज मी मनोभावे उपवास करून तुझे नामस्मरण करेन, हे व्रत पूर्ण करण्याची शक्ती मला दे अशी प्रार्थना करावी. शेवटी हातातील ते पाणी आणि अक्षता ताम्हणात किंवा देवापुढे सोडून देऊन देवाला नमस्कार करावा. अशा प्रकारे श्रद्धेने संकल्प केल्यावर उपवासाला सुरुवात करावी.
advertisement
चार प्रहरांच्या पूजेची वेळ -
महाशिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरांच्या पूजेला खूप महत्त्व असतं:
पहिला प्रहर: 15 फेब्रुवारी, संध्याकाळी 6:11 ते रात्री 9:23 पर्यंत.
दुसरा प्रहर: 15 फेब्रुवारी, रात्री 9:23 ते 16 फेब्रुवारी, मध्यरात्री 12:35 पर्यंत.
तिसरा प्रहर: 16 फेब्रुवारी, मध्यरात्री 12:35 ते पहाटे 3:47 पर्यंत.
चौथा प्रहर: 16 फेब्रुवारी, पहाटे 3:47 ते सकाळी 6:59 पर्यंत.
advertisement
निशिथ काळ (सर्वात शुभ वेळ): 16 फेब्रुवारी, मध्यरात्री 12:09 ते 1:01 पर्यंत असेल.
पूजा कशी करावी?
महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक घालावा. पाण्यात थोडं केशर मिसळून ते पाणी महादेवाला अर्पण करणं खूप चांगलं मानलं जातं. शंकराला बेलपत्र, भांग, धतूरा, फळं आणि मिठाई अर्पण करावी. त्यानंतर 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा जप करावा. देवासमोर तुपाचा दिवा लावून शिव-पार्वतीची आरती करावी. या दिवशी शिवपुराणाचं वाचन करणं आणि रात्रभर जागरण करणं खूप फलदायी मानलं जातं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 3:19 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Mahashivratri Vrat 2026: आधी संकल्प मग उपवासाची सुरुवात! यंदाच्या महाशिवरात्रीला या पद्धतीनं करा शिव-आराधना










