Walking: चाला आणि वजन कमी करा, पोटावरची चरबी कमी करण्यासाठी टिप्स फॉलो करा

Last Updated:

चालणं हा तंदुरुस्त तब्येतीसाठी उत्तम व्यायाम मानला जातो. वजन कमी करणं, शरीर स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी चालणं हा पर्याय आहे.

News18
News18
मुंबई : चालणं हा तंदुरुस्त तब्येतीसाठी उत्तम व्यायाम मानला जातो. वजन कमी करणं, शरीर स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी चालणं हा चांगला पर्याय आहे. पण फक्त चालण्यानं पोटाची चरबी कमी करायची असेल तर चालण्यासाठी या टिप्स फॉलो करुन पाहा. कारण वजन कमी करण्यापेक्षा चरबी कमी करणं आणि विशेषतः पोटाभोवती जमा झालेली चरबी कमी करणं अधिक कठीण वाटतं. तुम्ही फक्त चालून पोटाची चरबी कमी करू शकता.
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बैठी जीवनशैली यामुळे सर्व वयोगटातील लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या दिसते. आजकाल सर्व काही अगदी यांत्रिक पद्धतीनं होत असल्यानं, कोणतंही काम करण्यासाठी शारीरिक पातळीवर जास्त मेहनत करावी लागत नाही. यामुळेच सध्याच्या काळात शारीरिक हालचालींना सर्वाधिक प्राधान्य दिलं जात आहे.
1. पोटाची चरबी लवकर कमी करायची असेल, तर दररोज किमान 30 मिनिटं वेगानं चाला. यामुळे हृदयाची गती देखील सुधारते.
advertisement
2. चालताना तुमच्या शरीराची ढब कशी असेल याचा अंदाज घेऊन चाला. कारण त्याचा निश्चितच उपयोग होतो.
3. खांदे मागे ठेवून सरळ उभे राहा आणि नंतर चालायला सुरुवात करा. अशा प्रकारे स्नायू सक्रिय होतात ज्यामुळे शरीर मजबूत होतं.
4. कालावधी वाढवा: वेगासोबतच तुम्ही दररोज किती वेळ चालता हे देखील महत्त्वाचं आहे. दररोज अर्धा तास चालणं सुरु करा आणि नंतर हळूहळू हा कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करा. दीर्घकाळ जलद चालण्यानं हृदय गती वाढते, ज्यामुळे कॅलरी बर्न होतात आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पोटाची चरबी कमी करू शकाल.
advertisement
5. संतुलित आहार: संतुलित आहार घेतल्यानं शरीराला आवश्यक कार्यांसाठी आवश्यक ऊर्जा मिळते आणि चयापचय वेग वाढतो, जे वजन कमी करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. संपूर्ण सकस आहार आणि फळं आणि भाज्यांसारखे पौष्टिक पदार्थ आपल्या नियमित आहारात असू द्या. जंक फूड आणि प्रोसेस्ड फूड खाऊ नका. असं केल्यामुळे शरीरातील कॅलरीज कमी होतात, ज्यामुळे वजन कमी करणं आणि पोटावरील चरबी कमी करणं सोपं होतं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Walking: चाला आणि वजन कमी करा, पोटावरची चरबी कमी करण्यासाठी टिप्स फॉलो करा
Next Article
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement