TRENDING:

Hibiscus : केसांच्या वाढीसाठी नैसर्गिक उपाय, जास्वंदाच्या फुलांचा आणि पानांचा करा वापर

Last Updated:

केसांच्या वाढीसाठी तुम्ही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. जास्वंदीची फुलं केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. भरपूर जीवनसत्त्वं आणि अँटिऑक्सिडंट्स, केसांच्या वाढीस मदत करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : केस गळणं आणि पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रकारची उत्पादनं वापरली जातात. पण काही वेळा त्यामध्ये आढळणारे केमिकल तुमच्या केसांना फायद्याऐवजी हानी पोहोचवू शकतात. अशावेळी काही घरगुती उपाय तुम्हाला उपयुक्त ठरु शकतात. केसांच्या वाढीसाठी तुम्ही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.
News18
News18
advertisement

केसांच्या वाढीसाठीचा एक उपाय म्हणजे जास्वंदीची फुलं. केसांसाठी ही फुलं खूप फायदेशीर ठरू शकतात. या फुलांमध्ये, असलेली भरपूर जीवनसत्त्वं आणि अँटिऑक्सिडंट्स केसांच्या वाढीसाठी मदत करतात.

Hair Growth: केसांच्या वाढीसाठी ही पथ्यं पाळा, केसांची गुणवत्ता सुधारेल

जास्वंदाच्या फुलामध्ये व्हिटॅमिन सी आढळतं, ज्यामुळे केस गळणं थांबवण्यास मदत होते, यासोबतच यामध्ये आढळणारे अमीनो ॲसिड केस मजबूत करण्यास मदत करतात. तसंच, त्याचे प्रतिजैविक गुणधर्म डोक्यातील कोंडा काढून टाकण्यास मदत करतात.

advertisement

जास्वंदीच्या फुलापासून तेल बनवण्याची पद्धत:

केसांसाठी जास्वंदीचं तेल तयार करण्यासाठी, आपल्याला जास्वंदीची 8-10  फुलं आणि जास्वंदीची पानं आणि एक कप खोबरेल तेल आवश्यक आहे.

Nutmeg Powder : एक चमचा जायफळ पावडर दुधात मिसळून प्या, पोटाच्या तक्रारी होतील दूर, तब्येत राहिल तंदुरुस्त

तेल बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात खोबरेल तेल टाकून गरम करा. आता जास्वंदीची फुलं आणि पानं घालून उकळा. 10 ते 15 मिनिटं तेलात उकळल्यानंतर गॅस बंद करा. तेल थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवा.

advertisement

कसं वापरावं -

2 ते 3 चमचे तेल तळ हातावर घ्या आणि संपूर्ण डोक्याला लावा आणि हलक्या हातानं मसाज करा. हे तेल अर्धा ते एक तासानंतर केस धुवून स्वच्छ करा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा जास्वंदीच्या तेलानं मसाज केल्यानं केसांची वाढ होण्यास मदत होते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hibiscus : केसांच्या वाढीसाठी नैसर्गिक उपाय, जास्वंदाच्या फुलांचा आणि पानांचा करा वापर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल