TRENDING:

Health Tips: मन होईल लगेच शांत! नाशिकच्या इंजिनिअरने बनवले एक नंबर डिव्हाईस, पेटंटही मिळालं! VIDEO

Last Updated:

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विजय याने आपल्या साथीदारांच्या मदतीने अनेक संशोधन केले आणि काही वर्षांपूर्वी त्याने हे जगातले पहिले मनाला शांत करण्याचे यंत्र बनवले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक मनुष्य हा व्यस्त झालेला आहे. या दगदगीच्या जीवनात आपले मन सुद्धा विचाराने धावत असते आणि यामुळे याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर आणि शरीरावर होत असतो. दिवसभर विचार थांबत नाहीत, झोप लागत नाही, मेंदू जड वाटतो आणि मन नेहमीच कुठेतरी भूतकाळात किंवा भविष्याच्या काळजीत अडकलेले असते. यामुळे हा आजच्या काळाचा सर्वात मोठा मानसिक आजार ठरत चाललाय. लाखो लोक मेडिटेशन तसेच मन शांत करण्यासाठी कोर्सेस करतात, थेरपी घेतात पण मेंदू शांत व्हायचे नाव घेत नाही.
advertisement

यावरच उपाय म्हणून नाशिकच्या विजय ठाकूर या तरुणाने मनाचे ऑफ बटण शोधून काढले आहे. विजय हा इंजिनिअरिंग झालेला तरुण आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना अभ्यासात येत असलेल्या अडचणी या थेट मनाशी जुळलेल्या आहेत. मन शांत नसेल तर अभ्यासही होत नसतो असे जेव्हा त्याला समजले तेव्हापासून हा तरुण अशा काही अनोख्या शोधात लागला.

advertisement

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विजय याने आपल्या साथीदारांच्या मदतीने अनेक संशोधन केले आणि काही वर्षांपूर्वी त्याने हे जगातले पहिले मनाला शांत करण्याचे यंत्र बनवले आहे. ज्याने आपण आपले मन हे स्थिर करू शकणार आहोत. त्याचे हे यंत्र आता विविध 47 देशात देखील पेटंट झालेले आहे.

Farmer Success: शेतकऱ्यानं लावलं डोकं, शेतमाल नव्हे रोपांचीच सुरू केली विक्री, कमाई लाखात!

advertisement

कसे सुचले माईंड ऑफ डिव्हाईस 

आपण मोबाईल वापरतो काही कालावधीनंतर तो स्लो होतो, कधी हँग देखील होतो. गरम होतो मग आपण काय करतो? तर आपण एकच रीसेट बटन दाबतो आणि तो पुन्हा फुलफ्लेजमध्ये कामाला लागतो. मग आपल्या मनासाठी असं एखादं रीसेट बटन हवं नाही का? ह्या विचारापासूनच माईंड ऑफ या संकल्पनेचा जन्म दिला गेला.

advertisement

काय काम करते हे यंत्र 

आपला श्वास हा मेंदूसाठी सर्वात नैसर्गिक सिग्नल आहे. वापरकर्त्याचा श्वास रिअल-टाईममध्ये कॅप्चर करतो आणि त्याचा नैसर्गिक आवाज त्यालाच ऐकवतो. त्याचवेळी खास निवडलेल्या बायनॉरल फ्रिक्वेन्सी ऑडिओ ट्रॅक मेंदूच्या लहरींना बीटा ब्रेनवेव्ह ( Stress मोड) मधून अल्फा/थीटा (Calm मोड) मध्ये नेतात. याचा परिणाम काही सेकंदांत मन शांत होतं आणि मेडिटेशन आपोआप सुरू होतं आणि तणावाचे परिणाम कमी होऊ लागतात. अॅपवर बसून श्वास मोजण्याची, डोळे मिटून ध्यान करण्याची गरज नाही हे यंत्र ते सगळं आपोआप घडवतो.

advertisement

संशोधनावर आधारित इनोव्हेशन

माईंड ऑफचा पाया ध्वनीलहरींचा मेंदूवर होणारा परिणाम करणे न्यूरोसायन्स (श्वासाचा भावनांवर होणारा परिणाम) आणि लयबद्ध गाणी (तालावर मेंदूची नैसर्गिक समायोजन प्रक्रिया) या शास्त्रावर आहे.

आपण मेडिटेशन जमत नाही म्हणून स्वतःलाच दोष देतो. पण समस्या आपल्या शिस्तीत नाही, समस्या मेंदूच्या ब्रेनवेव्ह पॅटर्नमध्ये असते. माईंड ऑफ मेंदूला वेगाने योग्य फ्रिक्वेन्सीवर आणतो, त्यामुळे मेडिटेशन, फोकस आणि झोप आपोआप सोपी होते.

या पद्धतीने मेंदूच्या लहरींमध्ये बदल होऊन तो जलदपणे बीटा (उत्तेजित/ताण) पासून अल्फा/थीटा (शांत/ध्यान) स्थितीकडे जातो. त्यामुळे मेडिटेशन जमत नसेल त्या लोकांनाही पहिल्याच सत्रात फरक जाणवतो आणि 5 दिवसांच्या नियमित वापरात भावनांवर ताबा परत येण्याचे पहिले संकेत दिसतात. अशा पद्धतीने हे माईंड ऑफ मशीन काम करत असते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: मन होईल लगेच शांत! नाशिकच्या इंजिनिअरने बनवले एक नंबर डिव्हाईस, पेटंटही मिळालं! VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल